मुंबई: ज्वारी(jwari) ग्लुटेन फ्री असते. आरोग्यदायी धान्यामध्ये ज्वारीचा समावेश होते. भारतात ज्वारीला विविध नावांनी ओळखले जाते. ज्वारीचे पीठ बनवले जाते. याचा वापर भाकरी, चिला तसेच डोसा बनवण्यासाठी केला जातो. थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारीची भाकरी खाल्ली जाते. ज्वारीची बनवलेली भाकरी दररोज खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात.
ग्लुटेन फ्री
ग्लुटेन हा असा प्रोटीन घटक आहे जो गहू आणि जव आधारित खाद्यपदार्थांमध्ये आढळतो. यामुळे सूज, पोटदुखी तसेच पाचनाच्या समस्या वाढतात. ज्वारीमध्ये ग्लुटेन नसल्याचे हे मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते.
भरपूर फायबर
जव अथवा तांदूळ अशा धान्यांच्या तुलनेत ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्वारीच्या एका सर्व्हिंगमध्ये १२ ग्रॅमहून अधिक फायबर असते. हाय फायबर असलेले डाएट लठ्ठपणा, स्ट्रोक, हाय ब्लडप्रेशर, हृदयरोग, डायबिटीज आणि पचनाच्या समस्यांपासून दिलासा देतात.
ब्लड शुगर नियंत्रणात
ज्वारी हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असते जे हळू हळू पतचे. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे.
प्रोटीनचे अधिक प्रमाण
१०० ग्रॅम ज्वारीमध्ये ११ ग्रॅम प्रोटीन असते. यामुळे शरीराला एनर्जी मिळते तसेच पेशी रिपेअर होण्यास मदत होते.
हाडांसाठी चांगले
ज्वारीमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. ज्वारी शरीरात कॅल्शियमचा स्तर कायम राखण्यास मदत करतात. कारण मॅग्नेशियन कॅल्शियम मोठ्या प्रमाणात शरीरात शोषून घेते.
वेट लॉसमध्ये फायदेशीर
ज्वारीमध्ये इतर धान्यांच्या तुलनेत अधिक फायबर असते. फायबरमुळे पोट भरलेले राहते आणि यामुळे तुम्ही कमी खाता. यामुळे वजन कमी होण्यास फायदा होतो.