Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीYoutube Videos : युट्यूबवरील 'मरण्याची सोपी पद्धत' पाहून नऊ वर्षांच्या मुलाने केली...

Youtube Videos : युट्यूबवरील ‘मरण्याची सोपी पद्धत’ पाहून नऊ वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या!

उत्तरप्रदेशातील धक्कादायक घटना

लखनऊ : हल्ली लहान मुलांच्या हातात मोबाईल (Mobile) दिल्यावर ते काय करतील याचा काहीच नेम नाही. अगदी दोन ते तीन वर्षांच्या बाळालाही युट्यूब (Youtube) म्हणजे काय आणि ते कसं चालवायचं हे माहित असतं. आपलं बाळ जेवत नाही म्हणून पालक बिनधास्त मुलांच्या हातात मोबाईल देतात. पण याचे किती मोठे दुष्परिणाम भोगावे लागतील याची कल्पना त्यांना येत नाही. उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) हमीरपूर जिल्ह्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ नऊ वर्षांच्या मुलाने युट्यूबवरील एक व्हिडीओ पाहून आत्महत्या केली आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.

मृत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी जेव्हा ते घरी आले तेव्हा नऊ वर्षांचा हा मुलगा घरात मोबाईलवर खेळत बसला होता. यानंतर त्याने यूट्यूबवर मरण्याची सोपी पद्धत (Easy way to die) असं सर्च केलं. या सर्चनुसार आलेले काही शॉर्ट व्हिडिओ त्याने पाहिले. त्यानंतर त्याने गुपचुप सर्वांच्या नकळत आतल्या खोलीत जाऊन गळफास घेतला. यामुळे त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.

मुलाचे वडील हे एक व्यावसायिक (Businessman) आहेत. आपल्या घरी सर्व काही सुरळीत होतं. पैशांचीही कोणतीच समस्या नव्हती. विशेष म्हणजे मृत मुलाचा याच महिन्यात ११ डिसेंबर रोजी उत्साहात वाढदिवस साजरा झाला होता. पुढच्या दहा दिवसांत असं काय झालं ज्यामुळे मुलाने हे टोकाचं पाऊल उचललं असावं, की त्याच्याही नकळत व्हिडीओची कॉपी करण्याच्या नादात त्याच्याकडून ही आत्महत्या घडली हा एक मोठा प्रश्न आहे.

सुमेरपूर पोलीस ठाणे क्षेत्रात हा प्रकार समोर आला. याप्रकरणी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. सध्या अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -