Monday, July 22, 2024
Homeदेशदेशात कोरोनाचे ६४० नवे रुग्ण, आरोग्य विभागाची चिंता वाढली, सक्रिय रुग्ण ३...

देशात कोरोनाचे ६४० नवे रुग्ण, आरोग्य विभागाची चिंता वाढली, सक्रिय रुग्ण ३ हजार

नवी दिल्ली : देशातील काही भागांत कोरोना(corona) रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. शुक्रवारी देशात ६४० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. अनेक राज्यांमध्ये सक्रिय कोविड रुग्णांची वाढ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात सक्रिय रुग्णांची संख्या २,९९७ वर पोहोचली आहे. एका दिवसापूर्वी हा आकडा २,६६९ होता. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यासह केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी येथे कोरोनाची सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एकट्या केरळमध्ये २,६०६ सक्रिय प्रकरणे आहेत. येथे गुरुवारी (२१ डिसेंबर) एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. येथे दररोज ५०० हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. कर्नाटकात १०५ आणि महाराष्ट्रात ५३ कोविड प्रकरणे आहेत. अनेक महिन्यांनंतर, नोएडा, यूपीमध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण (५४) आढळला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, रुग्ण नुकताच नेपाळला गेला होता. तो गुरुग्राम, हरियाणात काम करतो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, कोरोनाचा नवीन जेएन १ व्हेरिएंट आतापर्यंत ४१ देशांमध्ये पसरला आहे. फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, कॅनडा आणि स्वीडनमध्ये जेएन१ ची प्रकरणे सर्वाधिक आहेत. भारतात नवीन प्रकाराची २१ प्रकरणे आहेत. कोविड-१९ मधून तब्बल ४,४४,७०,८८७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत, कोविड लसीचे २२०.६७ कोटी (२२०,६७,७९,०८१) डोस देण्यात आले आहेत.

डब्ल्यूएचओने जेएन१ चा समावेश ‘ व्हेरिएंट ऑफ इंटरेस्टर’ म्हणून केला आहे. डब्ल्यूएचओने सांगितले की, आतापर्यंतचे विश्लेषण असे सांगत आहे की सध्याची लस जेएन१ प्रकारावर पूर्णपणे प्रभावी आहे. यापासून लोकांना फारसा धोका नाही.
तथापि, डब्ल्यूएचओने खबरदारी म्हणून एक सल्ला जारी केला आहे. यामध्ये लोकांना गर्दी, बंद किंवा प्रदूषित हवा असलेल्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय आवश्यक अंतर राखण्यासही सांगण्यात आले आहे.

केंद्राच्या सूचना

राज्यांना जास्तीत जास्त कोविड चाचण्या घेण्यास सांगण्यात आले. केंद्र सरकारने नवीन प्रकाराबाबत सर्व राज्यांसाठी सल्ला जारी केला आहे. यामध्ये सर्व राज्यांना जास्तीत जास्त कोविड चाचण्या घेण्यास सांगण्यात आले आहे. पॉझिटिव्ह नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत.

केरळमध्ये कोविड-१९ च्या वाढत्या केसेसमुळे तेथेही एक अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. येथे, ६० वर्षे आणि त्यावरील सर्व वृद्ध, मूत्रपिंड, हृदय, यकृत यासारख्या आजारांनी ग्रस्त लोक, गर्भवती महिला, स्तनदा माता यांना घराबाहेर पडताना अनिवार्यपणे मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

केंद्राच्या सूचनेनुसार, आता जास्त घाबरण्याची गरज नाही किंवा ताबडतोब निर्बंध लादून सीमेवर (केरळ, तामिळनाडू राज्ये) पाळत वाढवण्याची गरज नाही. तथापि, केरळ आणि तामिळनाडूला लागून असलेल्या सर्व सीमावर्ती जिल्ह्यांनी सतर्क राहावे. ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करताना लोकांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जेएन १ प्रकार भारतात कोठून आला?

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांच्या मते, पहिला जेएन१ प्रकार ८ डिसेंबर रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे आढळून आला. ७९ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महिलेमध्ये इन्फ्लूएंझा सारखी आजाराची सौम्य लक्षणे होती. मात्र, नंतर ती सावरली.

नवीन सब-व्हेरियंटबाबत अलर्ट

कोविड सब-व्हेरियंट जेएन१ प्रथम युरोपियन देश लक्झेंबर्गमध्ये ओळखले गेले. येथून ते अनेक देशांमध्ये पसरू लागले. हे सब-व्हेरियंट पिरोलो व्हेरियंटशी जोडलेले आहे .हे मानवी शरीराच्या प्रतिकारशक्तीसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच नवीन सब-व्हेरियंटबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -