Friday, June 28, 2024
Homeताज्या घडामोडीPune Water Supply : पुण्यात पाणीटंचाई! पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा आज पाणी...

Pune Water Supply : पुण्यात पाणीटंचाई! पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा आज पाणी पुरवठा बंद

पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

पुणे : सध्या वातावरणात अनेक अनपेक्षित बदल झाल्याने हिवाळ्याच्या मोसमात देखील हवामान वेगळं आहे. दक्षिणेकडील राज्यांत तर मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडे राज्यातील पुण्यात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा आज बंद करण्यात आला आहे. पालिकेने पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत गेल्यावर्षीपेक्षा यंदा दहा टक्के कमी पाणीसाठा आहे. चार धरणात ७८.४७ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षी हाच साठा ८८.४१ टक्के इतका होता. त्यामुळे जानेवारी महिना उजाडायच्या आधीच पुणे शहराला पाणी कपातीची समस्या सोसावी लागत आहे. देखभालीच्या कामासाठी चिंचवडमध्ये पाणी कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे कमी पाणीसाठ्यामुळे पाटबंधारे विभागाने पुणे महानगरपालिकेला पाणी बचत करा अशा सूचना दिल्या आहेत.

पाणीसाठ्यावरुन येत्या काही दिवसात पाटबंधारे विभागासोबत पुणे महानगरपालिकेचे अधिकारी बैठक घेण्याची शक्यता आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात सुद्धा पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे.

पुणे जिल्ह्यातील धरण साखळी पाणीसाठा (टक्केवारी)

खडकवासला: ७७.०७ टक्के

पानशेत: ८८.२७ टक्के

वरसगाव: ८२.०५ टक्के

टेमघर: ३८ टक्के

यंदाच्या वर्षात मुबलक पाऊस न झाल्याने पुण्यातील धरणं १०० टक्के देखील भरली नाहीत. त्यामुळे पुणेकरांवर पाणी संकट कोसळलं आहे. म्हणूनच उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. तसेच या पाण्याचा वापर देखील योग्य प्रमाणात करावा लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -