मुंबई: ४७ वर्षीय अभिनेता श्रेयस तळपदेला(shreyas talpade) रुग्णालयातून डिस्चार्ज(discharge) देण्यात आला आहे. हार्ट अॅटॅक आणि अँजिओप्लास्टी केल्यानंतर तो आता पूर्णपणे ठीक आहे. काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिनेत्याची पत्नी दीप्ती तळपदेने याबाबतची पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. दीप्तीने डॉक्टर्स, मित्र परिवार, आप्तस्वकीय यांसोबतच चाहत्यांचेही आभार मानलेत. या सर्वांनी श्रेयसच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली होती.
दीप्तीने शेअर केली भावनिक पोस्ट
श्रेयस तळपदेची पत्नी दीप्तीने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले, माझे आयुष्य, श्रेयस घरी परतला आहे. सेफ अँड साऊंड. मी श्रेयसशी वाद घालायचे हे बोलून की अखेर कोणावर विश्वास दाखवू. आज मला त्याचे उत्तर मिळाले. देवावर. तो माझ्यासोबत होता. त्या संध्याकाळी जेव्हा ही घटना घडली होती. मला नाही वाटत मी त्याच्या अस्तित्वावर सवाल करेन.
मी एक क्षण घेऊन आणि शहरातील त्या सर्वांचे आभार मानीन ज्यांनी माझी मदत केली. मी त्या संध्याकाळी मदतीसाठी एक हाक मारली आणि मला १० मदतीचे हात मिळाले. जेव्हा श्रेयस गाडीच्या आत होता तेव्हा त्यांना माहिती नव्हते की ते कोणाची मदत करत आहेत. ते सगळे केवळ पळत आले होते. त्यांना नक्कीच देवाने पाठवले असणार. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. आशा आहे की माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचावा. प्लीज विश्वास ठेवा की मी तुमची मनापासून आभारी आहे. मुंबईची हीच बाब खास आहे इथे आपण एकटे नसतो. सगळे एकत्र आहोत.
View this post on Instagram
मी आमचा सर्व मित्र परिवार, कुटुंबातील लोक आणि सिने इंडस्ट्रीमधील लोकांचे आभार मानीन. हिंदी-मराठी सगळ्यांनी आम्हाला प्रेम दिले. अनेकांनी आपली कामे सोडून माझ्या मदतीला आले. तुमच्यामुळे मी एकटी नाही हे मला मसजले. अनेकांनी मला सपोर्ट केला. माझ्या पतीला वाचवण्यासाठी मी सर्व डॉक्टर्स तसेच नर्सेसचे आभार मानेन. तुमच्या सगळ्यांसाठी माझा छोटासा थँक्यू खूप लहान आहे. सर्व चाहत्यांचे आभार ज्यांनी श्रेयसच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आणि त्याच्यासाठी प्रार्थना केली.
श्रेयसला काही दिवस आधी अचानक हार्ट अॅटॅक आला होता. तो अभिनेता अक्षय़ कुमारसोबत वेलकम टू जंगल सिनेमाचे शूटिंग करत होता. शूटिंग संपल्यानंतर तो अचानक बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. येथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.