Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीकायदे फक्त हिंदुनीच पाळायचे का?आ. नितेश राणेंचा नाशिक पोलिस आयुक्तांसह मनपा आयुक्तांना...

कायदे फक्त हिंदुनीच पाळायचे का?आ. नितेश राणेंचा नाशिक पोलिस आयुक्तांसह मनपा आयुक्तांना इशारा

नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक शहरात(nasik) सामाजिक दरी वाढत असून त्यातून सामाजिक तेढ निर्माण होत असून नाशिक पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना आम्ही अल्टीमेटम देत आहोत, कायदा फक्त हिंदुनीच पाळायचा का? असा सवाल उपस्थित करीत आ. नितेश राणे यांनी शहरातील भोंगे आणि भद्रकातील अतिक्रमण यावर प्रशासनाला गंभीर इशारा दिला आहे.

एका शैक्षणिक संस्थेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यास आ. नितेश राणे नाशिकमध्ये आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी सांगितले की, नाशिक मध्ये सामाजिक तेढ मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. अनाधिकृत भोंग्यांबाबत कोर्टाचा स्पष्ट आदेश आहे. ते किती वाजता वाजले पाहिजेत, कधी वाजले पाहिजेत . याविषयी डेडलाईन आहे. याविषयीची काही नियमावली आहे. सर्व कायदे हिंदू धर्मानेच पाळले पाहिजेत का? इतर धर्माने का नाही? या भोंग्यांवर कारवाई करणार नसाल तर येणाऱ्या काळात जन आंदोलन उभे करावे लागणार आहे. सरकार आपले आहे. अतिक्रमणाच्या नावाने लँड जिहाद सुरू आहे. रात्री दीड दोन वाजता केवळ अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांना हॉटेल चालवायची परवानगी मिळत असेल तर यावर विशेष लक्ष घालावे लागेल.

दोन्ही आयुक्तांना अल्टीमेटम

पोलीस खाते आमचे आहे.पोलीस विभागात सडके आंबे आहेत किंवा नाशिकच्या भाषेत बोलायला गेलं तर सडके द्राक्ष आहेत. त्यांना आम्हाला बाजूला करण्याचे काम गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून आम्हाला करावे लागेल. त्रासदायक अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई होणारच. वाढत असलेल्या लँड जेहाद आणि अवैध भद्रकालीतील अतिक्रमण संदर्भात मी सभागृहात विषय घेतला आहे. भद्रकाली परिसरामध्ये दुचाकीच्या मागच्या सीटवर अनेक लोक अमली पदार्थ आणि ड्रग विकत आहेत . त्याचे व्हिडिओ पण माझ्याकडे आहेत. ते मी विधानसभेत सादर केले आहेत.

येणाऱ्या काही दिवसांमध्ये भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी गजेंद्र पाटील यांच्यावर कारवाई होणार आहे. अवैध भद्रकालीतल्या अतिक्रमणांवर नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी लक्ष घालावे. आयुक्तांना पुन्हा आठवण करून देण्याची गरज भासली नाही पाहिजे. जहाद्यांना मदत करायचे असेल तर कारवाई करण्याची आमची तयारी आहे, हे मनपा आयुक्तांनी लक्षात ठेवावे. अतिक्रमणांच्या नावाने लँड जिहाद सुरू आहे. रात्री दीड दोन वाजता केवळ अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांना हॉटेल चालवायची परवानगी मिळत असेल तर यावर विशेष लक्ष घालावे लागेल.असा इशारा त्यांनी दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -