नाशिक(प्रतिनिधी):-साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक रोड संस्थेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक रोड येथील प्राचार्य डॉ. भा. वि. जोशी शैक्षणिक संकुल येथे संस्थेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार नितेश राणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक शहराचे माजी महापौर अशोक दिवे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण भालचंद्र जोशी, अनिल वसंत अरिंगळे, मिलिंद शिवप्रसाद पांडे, भूषण राधाकृष्ण कानवडे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी काही लोक जाणून-बुजून संस्थेविरोधात पत्रव्यवहार करत तक्रार करत आहेत याबाबत चॅरिटी कमिशनरशी बोलावे लागेल, वेळीच अशा पद्धतीने त्रास देणाऱ्यांनी वेळीच संस्थेविरोधातील भूमिका बदलावी अन्यथा आज मी फक्त ट्रेलर दाखवायला आलो आहे, संपूर्ण पिक्चर दाखवायची वेळ कोणीही आमच्यावर आणू नये तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या संस्थेच्या मागे भक्कमपणे उभे आहेत असेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी आपल्या खास शैलीत अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय विषयांना हात घालत आपली भूमिका स्पष्ट मांडली. यावेळी माझा मतदार संघ पाकिस्तानात आहे का मी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य आहे महाराष्ट्रातील कुठल्याही प्रश्नावर बोलू शकतो त्यासाठी मी कुठल्या ठिकाणचा व माझा मतदार संघ कोणता हे महत्त्वाचं नाही, जिथे गरज पडेल तिथे मी बोलणारच आणि जर माझ्या मतदार संघात म्हणजे कणकवलीत काही प्रश्न असतील तर इतर कुठलाही सदस्य त्या विषयात बोलला तर मी नक्कीच त्यांचे स्वागत करेल कारण विधिमंडळ सदस्य हा फक्त मतदारसंघापूर्ती मर्यादित नाही.
यावेळी नाशिक मध्ये काही ठराविक लोकवस्तींमध्ये जाणून-बुजून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत असून कायदे व नियम फक्त हिंदू धर्मियांसाठीच नाहीत तर सर्व धर्मीयांनी त्याचे पालन करणे गरजेचे आहे. कोर्टाचे आदेश असतानाही अनधिकृत भोंगे वाजवले जातात यावर येथील पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत कारवाई करावी अन्यथा पुन्हा नाशिक मध्ये येऊन जन आंदोलन करावं लागेल असा सज्जड इशारा दिला. हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या कामकाजा दरम्यान नाशिक शहराच्या भद्रकाली परिसरातील रात्री बे रात्री सुरू असलेले पार रेस्टॉरंट याबाबत तसेच येथे बाईकच्या डिक्की मध्ये ड्रग्स ठेवले जाते यावर मी सभागृहात प्रश्न उठवला भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांचे नाव देखील घेतले.
अतिक्रमणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लँड जिहाचा मुद्दा देखील प्रकर्षाने या भागात जाणवत असल्याने महापालिका आयुक्तांकडे देखील वेळोवेळी याबाबत पाठपुरावा करत आहे या भागात व शहरात अशा पद्धतीचे अनुचित प्रकार घडत असल्याबाबत शहराच्या दोन्हीही आयुक्तांशी बोललो आहे कारवाई करणार नसेल तर त्या खुर्चीवर किती दिवस तुम्हाला ठेवायचे याबाबत आम्हाला देखील मग वरिष्ठांशी बोलावे लागेल या शब्दात राणेंनी चौफेर सर्वांचाच समाचार घेतला.
राम मंदिरावर बोलण्याचा कोणाला नैतिक अधिकार नाही. राम मंदिर प्रश्न धुमसत असताना उद्धव ठाकरे तिसऱ्या माळ्यावर बसून कॅमेरा पुसत होते त्यामुळे उद्धव ठाकरेंच या विषयात कुठलेही योगदान नाही आणि संजय राऊतचं म्हणाल तर राम मंदिरा विरोधात लेख लिहिणारा तो एक नालायक व्यक्ती आहे हे लोक आणि राम मंदिर हे परस्पर विरोधी विषय आहेत.
महाराष्ट्र सह देशभरात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव सेनेचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा आणि ९३ बॉम्ब ब्लास्ट मधील जन्मठेपेची शिक्षा झालेला सलीम कुत्ता याच्या सोबत नाशिक मधील बडगुजर यांच्या नातेवाईकाच्या एका खाजगी फार्म हाऊस वर डीजेच्या तालावर थिरकतानाचा व्हिडिओ व फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर गृहमंत्र्यांनी एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले असून नाशिक पोलीस सलग पाच दिवसांपासून सुधाकर बडगुजर यांची कसून चौकशी करत आहेत. मात्र कुठल्याही प्रश्नावर समर्पक उत्तर मिळत नसल्याचे नाशिक पोलिसांकडून सांगण्यात येत आहे मात्र चौकशी दरम्यान सदरचे फार्म हाऊस हे आपल्या जवळच्या नातेवाईकाचे असल्याचे बडगुजर यांनी मान्य केले असून या पार्टीचे आयोजन कोणी केले व या मागचा हेतू काय याबाबत देखील सखोल तपास सुरू असून यामध्ये आमच्या पक्षाचा देखील कोणी पदाधिकारी असेल तर कुणाचीही गय केली जाणार नाही कारण देश विरोधी कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांसोबतची मैत्री ही खरा देशभक्त व हिंदू समाज मान्य करू शकत नाही.
याबरोबरच मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला असता आरक्षणाबाबत आमचं सरकार सकारात्मक आहे कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार अशी आमच्या सरकारची भूमिका आहे असे यावेळी आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले.