Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीMugdha Prathmesh : मुग्धा-प्रथमेशचा पार पडला हळदी सोहळा आणि ग्रहमख

Mugdha Prathmesh : मुग्धा-प्रथमेशचा पार पडला हळदी सोहळा आणि ग्रहमख

पाहा या समारंभातील सुंदर फोटोज

मुंबई : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ (Sa re ga ma pa Little champs) मधून प्रसिद्धी मिळालेले मोदक आणि मॉनिटर (Modak got Monitor) म्हणजेच सगळ्यांचे लाडके प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

काही महिन्यांपूर्वीच दोघांनीही आपल्या प्रेमाची सोशल मिडियावर (Social Media) कबुली दिली होती. यानंतर या जोडप्याने एकत्र अनेक फोटोज शेअर केले, ज्यांना चाहत्यांनी भरभरुन पसंती दिली.

नुकताच या जोडप्याचा हळदी सोहळा आणि ग्रहमख पार पडलं.

या सोहळ्यातील काही क्षण दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

प्रथमेशनेही आपल्या ग्रहमख सोहळ्याचे क्षण शेअर केले आहेत.

डिसेंबर महिन्यातच अगदी काही दिवसांपूर्वीच मुग्धाची मोठी बहीण मृदुलचाही लग्नसोहळा पार पडला.

त्यानंतर आता लगेच मुग्धाचा विवाहसोहळा पार पडत आहे. त्यामुळे वैशंपायन कुटुंबात सध्या जोरदार लगीनघाई सुरु आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -