जोहान्सबर्ग: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने आफ्रिकेसमोर विजयासाठी २९७ धावांचे आव्हान ठेवले आहे. तिसऱ्या स्थानावर आलेल्या संजू सॅमसनने या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने ११४ बॉलमध्ये १०८ धावा ठोकल्या. तर तिलक वर्मानेही ५२ धावांची खेळी केली.
भारताची सुरूवात थोडी डळमळीत झाली. ३४ धावसंख्या असताना भारताचा पहिला विकेट पडला. साई सुदर्शन १० धावा करून बाद झाला. तर रजत पाटीदार २२ धावा करून बाद झाला. दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्याने तिसऱ्या स्थानावर खेळण्यासाठी आलेल्या संजू सॅमसनने १०८ धावा तडकावल्या. त्याने आपल्या या खेळीदरम्यान ६ चौकार आणि ३ षटकार लगावले.
कर्णधार केएल राहुलने या सामन्यात २१ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या तिलक वर्माने ७७ बॉलमध्ये ५२ धावा ठोकल्या. यात त्याने ५ चौकार आणि १ षटकार ठोकला. रिंकू सिंहने ३८ धावांची खेळी केली. यासोबतच भारताने निर्धारित ५० षटकांत २९६ धावा केल्या.
आफ्रिकेकडून ब्युरेन हेंड्रिक्सने ३ विकेट घेतले. तर नांद्रे बर्गरने २ धावा केल्या. लिझाद विलियम्स, विआन मुल्दर, केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.