Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीSchool picnic Accident : शाळेच्या सहलीच्या बसला भीषण अपघात!

School picnic Accident : शाळेच्या सहलीच्या बसला भीषण अपघात!

एका शिक्षकाचा मृत्यू तर विद्यार्थी जखमी

इंदापूर : शाळेची सहल म्हटली की विद्यार्थी प्रचंड उत्सुक आणि उत्साहात असतात. मात्र, त्यांच्या आनंदावर विरजण घालणारी एक धक्कादायक घटना सोलापूरमध्ये (Solapur) घडली आहे. सहलीनिमित्त (Picnic) गेलेल्या शाळेच्या बसचा भीषण अपघात (School Bus Accident) झाला आहे. यामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. आज पहाटे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज जवळ हा अपघात घडला.

सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल निघाली होती. कोकण दर्शनासाठी (Konkan Darshan) ही मुलं गेली होती. मात्र, गणपतीपुळे येथून आज पहाटे सहल परतत असताना अकलूजमधील माळशिरस तालुक्यातील पाटील वस्ती लगत सहलीच्या बसची एका टेम्पोला जोरदार धडक बसली. या टेम्पोमधून बांबूची वाहतूक करण्यात येत होती. टेम्पो पंक्चर झाल्याने एका अवघड वळणावर थांबला होता. याच अवघड वळणावर टेम्पोला सहलीच्या बसची धडक बसली आणि अपघात घडला.

अपघातावेळी बसमध्ये चालक, २ पुरुष व २ महिला असे एकूण ४ शिक्षक व ४० विद्यार्थी होते. या अपघातात एका शिक्षकाला जीव गमवावा लागला आहे. तर जखमी झालेल्या इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -