Tuesday, May 13, 2025

विदेशताज्या घडामोडी

Video: इतके भयानक वादळ की रनवेवर ९० डिग्रीने फिरले विमान

Video: इतके भयानक वादळ की रनवेवर ९० डिग्रीने फिरले विमान

नवी दिल्ली: अर्जेंटिनामध्ये(argentina) वादळाने कहर केला आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस या वादळामुळे १६ लोकांचा मृत्यू झाला. वादळाच्या वेगवान हवेमुळे राजानी ब्यूनस आयर्समध्ये झाडे तसेच दिवेही कोसळले,


जोरदार वादळामुळे १७ डिसेंबरला ब्यूनस आयर्स जॉर्ज न्यूबेरी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्क करण्यात आलेल्या विमानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. यात व्हिडिओत दिसतेय की वेगवान वाऱ्यामुळे हे विमान रनवेवरच ९० डिग्रीपर्यंत फिरले. या दरम्यान विमानात चढणाऱ्या शिडींनाही टक्कर बसली.



वादळाचा कहर


अर्जेंटिना आणि त्याचा शेजारील देश उरुग्वेमध्ये आलेल्या जोरदार वादळाने अर्जेंटिनाच्या राजधानीतील इमारतींचे मोठे नुकसान केले. तसेच लाईटही गेली आहे. तर मेंब्यूनस आयर्सपासून ४० किमी दूर मोरेना शहरात झाडाची फांदी पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. उरु्ग्वेमध्ये रविवारी जोरदार वादळामुळे झाड पडल्याने आणि छपरे उडाल्याने कमीत कमी दोन जणांचा मृत्यू झाला.


 


वेगवान वारे


ब्रिटनमधून अर्जेंटिनाच्या प्रवासासाठी आलेल्या २५ वर्षीय क्लोरी येओमन्सने बीबीसीला सांगितले की तिला स्थानिक वेळेनुसार पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ब्यूनस आयर्स स्थित तिच्या अपार्टमेंटमध्ये वादळाची माहिती मिळाी. ती म्हणते मी माझ्या आयुष्यात इतके वेगवान वारे ऐकले नव्हते. त्याचवेळेस मी कार अलार्म आणि बाहेर अपघाताचा आवाज ऐकला. एका वादळाप्रमाणे वाटत होते. मला वाटत होते की आमची इमारत हलत आहे.

Comments
Add Comment