Saturday, May 10, 2025

देशमहत्वाची बातमी

Rajasthan: राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या कारला अपघात, दुसऱ्या गाडीने सीएमला केले रवाना

Rajasthan: राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या कारला अपघात, दुसऱ्या गाडीने सीएमला केले रवाना

जयपूर: राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा(bhajanlal sharma) मंगळवारी भरतपूरला आले होते. भरतपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचे भव्य स्वागत आहे. याठिकाणी ते आपल्या खाजगी निवासस्थानी गेले. तेथे कुटुंबियांना भेटून ते भरतपूरमधील सर्किट हाऊस पोहोचले. भरतपूरच्या सर्किट हाऊसमध्ये कार्यकर्ते तसेच विविध संघटनांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.


मुख्यमंत्री संध्याकाळी साडेसात वाजता गिरीराज जीच्या दर्शनसाठी भरतपूर येथून रवाना झाला.े मात्र गोवर्धन पोहोचण्याआधी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या कारचे चाक रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात गेले.


मुख्यमंत्री ज्या बाजूला बसले होते तेथील कारचा भाग एकदम खाली आला आणि गाडी बंद झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने दुसऱ्या गाडीने रवाना करण्यात आले. डींग जिल्हा पोलीस अधीक्षक बृजेश ज्योती उपाध्यक्ष यांनी सांगितले की यात कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.


मुख्यमंत्री बनल्यानंतर मंगळवारी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा पहिल्यांदा आपल्या घरी भरतपूर दौऱ्यावर गेले होते. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे भरतपूर येथे जोरदार स्वागत करण्यात आले. जिल्ह्याची सीमा कमालपुरा येथून ते भरतपूरपर्यंत प्रत्येक पावलावर त्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. भरतपूरमध्ये भजनलाल शर्मा यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.


Comments
Add Comment