नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या(corona) नव्या प्रकरणांनी पुन्हा एकदा टेन्शन वाढवले आहे. यातच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट JN.1 चे २१ रुग्ण आढळले आहेत. न्यूज एजन्सी पीटीआयच्या अधिकृत सूत्रांच्या हवाल्यांनी सांगितले की सब व्हेरिएंट JN.1च्या नव्या २१ प्रकरणांपैकी १९ प्रकरणे गोव्यात आढळली आहेत. तर केरळ आणि महाराष्ट्रातून एक-एक प्रकरण समोर आले आहे.
कोरोनाच्या नव्या प्रकरणाबाबत नीति आयोगाचे सदस्य व्ही के पॉल म्हणाले की घाबरण्याची गरज नाही. पॉलने सांगितले की कोरोना पिडीत लोकांमध्ये साधारण ९१ ते ९२ टक्के लोक घरीच उपचाराचा पर्याय निवडत आहेत.
तर केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत म्हणाले, भले या केसेस वाढत आहे मात्र ९२.८ टक्के केसेसवर घरातच उपचार होत आहेत. सोबतच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसच्या जेएन १ला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट असल्याचे सांगत हा अधिक धोकादायक नसल्याचे म्हटले आहे.
तयारींबाबत बैठक
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडावियाने कोरोनाचे वाढते केसेस पाहता राज्य आणि केंद्र शासिक प्रदेशाच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बुधवारी बैठक केली. मंडावियाने मीटिंगनंतर सांगितले की कोणत्याही प्रकारच्या आव्हानासोबत लढण्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू.
देशात किती केसेस?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आकड्यांनुसार कोरोना व्हायरसचे नवे ६१४ केसेस दाखल झाले आहे. यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढून २३११ झाली आहे.