मुंबई: क्रीडा मंत्रालयाने बुधवारी राष्ट्रीय खेल पुरस्कार २०२३ची(arjun award 2023) घोषणा केली आहे. यात भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या नावाचा समावेश आहे. त्याने २०२३ या वर्षात शानदार कामगिरी केली. यासाठी त्याला यंदाचा अर्जुन पुरस्कार २०२३ देण्यात येत आहे. ९ जानेवारी २०२४मध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार वितरित केला जाईल. यूपीच्या अमरोहामध्ये मोहम्मद शमीला पुरस्कार दिल्याची घोषणा झाल्यानंतर जल्लोषाचा माहौल आहे. त्याचे कुटुंबीय आनंद व्यक्त करत आहेत.
पुरस्काराची घोषणा होताच गावातील लोकांना एकमेकांना मिठाई भरवत अभिनंदन केले. मोहम्मद शमीने यंदाच्या विश्वचषकात शानदार कामगिरी केली होती. त्याने सर्वाधिक २४ विकेट घेतल्या होत्या आणि संघाला फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला अर्जुन अवॉर्डसाठी निवडण्यात आले.
क्रीडा मंत्रालयाने केली घोषणा
क्रीडा मंत्रालयाने घोषणा केली आहे की मेजर ध्यानचंद खेल रेत्न पुरस्कार २०२३ भारतीय शटलर चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रंकीरेड्डी सात्विक राई राजला बॅडमिंटनमधील योगदानासाठी दिला जाईल. मोहम्मद शमीसह अन्य २६ खेळाडूंना खेळ आणि खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी २०२३मध्ये अर्जुन पुरस्कार दिला जाईल.