Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीShivrayancha Chhava : 'शिवरायांचा छावा'चा थरारक लूक!

Shivrayancha Chhava : ‘शिवरायांचा छावा’चा थरारक लूक!

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील पहिला भव्यदिव्य चित्रपट

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रत्येक मराठी जनांच्या हृदयात उच्च स्थान आहे. महाराजांचा इतिहास पुन्हा पुन्हा वाचावा आणि त्यातून शिकवण घ्यावी असाच आहे. याच शिवाजी महाराजांचा इतिहास शिवराज अष्टकातून (Shivraj Ashtak) समोर आणण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) याने पेललं. दिग्पाल शिवरायांच्या आयुष्यावरील आठ सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. यातील प्रत्येक चित्रपटात शिवरायांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असणार आहे.

आतापर्यंत शिवराज अष्टकातील पाच सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि ते पाचही सिनेमे प्रचंड गाजले. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि सुभेदार अशा पाचही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता दिग्पालचा सहावा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तो म्हणजे ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava). या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजाची (Chhatrapati Sambhaji Maharaj) कथा उलगडणार आहे.

‘शिवरायांचा छावा’ सिनेमाचं थरारक पोस्टर आज आऊट करण्यात आलं. यामध्ये संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा कलाकार पाठमोरा उभा दिसत आहे आणि त्याच्यासमोर वाघ जबडा पसरुन उभा आहे. त्यामुळे संभाजी महाराजांची भूमिका नेमकी कोण साकारणार आहे, याबद्दल प्रेक्षकांना विशेष उत्सुकता आहे. सिनेमाच्या पहिल्या पोस्टरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ची निर्मिती मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी प्रियांका मयेकर यांनी सांभाळली आहे तर संकलन सागर शिंदे यांचे आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए . फिल्म्स सांभाळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

याआधी संभाजी महाराजांच्या जीवनावरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र, चित्रपटाच्या रुपात संभाजी महाराजांची कथा पहिल्यांदाच मांडली जाणार आहे. नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -