Friday, January 23, 2026

MP Suspended : सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह ४९ खासदारांचं आज निलंबन!

MP Suspended : सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह ४९ खासदारांचं आज निलंबन!

आतापर्यंत एकूण १४१ खासदार निलंबित

नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेतून गोंधळी खासदारांना निलंबित करण्याचा लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी सपाटाच लावला आहे. देशात आतापर्यंतच्या इतिसातील सर्वात मोठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी १४ खासदार, काल ३३ खासदार तर आज तब्बल ४९ खासदारांचं लोकसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. काल राज्यसभेतही ४५ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह आणखी ४९ खासदार निलंबित करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >