Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिककसं रोखणार शहरात घोंगावणारे अल्पवयीन गुंडांचं वादळ

कसं रोखणार शहरात घोंगावणारे अल्पवयीन गुंडांचं वादळ

मायकल खरात

नाशिक : अल्पवयीन गुन्हेगारांचं हब बनू पाहणाऱ्या नाशिक शहराची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. सर्वसामान्यांना जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे. गुन्हेगारीचं रॉ मटेरियल म्हणून ज्यांचा वापर होत आहे आणि कायद्याच्या चौकटीत अल्पवयीन म्हटलं की शिक्षा करण्यास अनेक बंधनं असल्याने नेमका याच गोष्टीचा फायदा शहरातील सुदृढ दहशत माजवणारे गुंड उचलत असल्याचे नाकारता येणार नाही. एक म्हण आहे उपरवाले की लाठी मे आवाज नही होती और वो दिखाई भी नही देती, याचप्रमाणे शहर पोलिसांनी वयाने अल्पवयीन मात्र गुन्हेगारीने प्रौढ गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचे आहे. पोलिसांच्या हातातली काठी दिसतच नसल्याने कदाचित गुंडांचं सशस्त्र बल शहरातील लोकवस्तीत आपलं मुक्त संचलन करत दहशत निर्माण करण्यात यशस्वी होत आहेत. आम्हाला शहर भयमुक्त करत गुन्हेगारीचा बंदोबस्त करणाऱ्या पोलीस यंत्रणेने निर्माण केलेली दहशत चालेल परंतु हातात धारदार शस्त्र घेऊन मिरवणारे नकोत. आमचा दोष तो काय आमच्या मुलांना आम्ही कुठल्या वातावरणात लहानाचं मोठं करतोय आपल्या अवतीभवती घडणारा अनुचित प्रकार बघून आमचे मुलं देखील वाईट प्रवृत्तींकडे आकर्षित होऊ शकतात कारण हे वय चांगलं किंवा वाईट यात घडण्याचं असतं आम्हाला चांगलं आणि भयमुक्त शहर पाहिजे आहे. पोलीस यंत्रणेने आम्हाला व देशाचं भवितव्य असणाऱ्या इतरांचं नुकसान होऊ देऊ नये, त्याला वेळीच पायबंद घालावा एवढीच आम्ही शहरवासीय म्हणून पोलीस आयुक्तांकडे याचना करतो.

काल रात्री आठ वाजेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी फाटा जवळील दामोदर चौक परिसरात व याच हद्दीतील इतर दोन-तीन ठिकाणी हातात कोयता घेत झेरॉक्सच्या दुकानात काउंटरवर असलेल्या काचेवर जोरदार प्रहार करतो, मोठमोठ्याने शिवीगाळ करत दहशत पसरवण्याचं काम करतो त्या ठिकाणी आपल्या लहानग्यांसोबत उभे असलेले सर्वसामान्य नागरिक व त्यांची मुलं हा सगळा प्रकार बघून भयभीत होतात पुढे हे गुंड भाजी विक्रेत्या, किराणा व्यवसायिक यांच्या दुकानात देखील जाऊन असाच प्रकार करतात, पैसे मागतात, मोठ्याने शिवीगाळ करतात. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल होतात हैदोस घालणाऱ्या गुंडांचा शोध घेतला जातो. यामध्ये एका गुंडाला ताब्यात घेतले जाते. मात्र तो अल्पवयीन असल्याचे समजते. मग पुढे काय कायद्याच्या चौकटीत असेल त्याप्रमाणेच कारवाई होणार, अशी घडणारी अप्रिय घटना रोजच शहरातील काही विशिष्ट ठिकाणी घडत आहे. या अल्पवयीन गुंडांचा देखील बंदोबस्त थोडं चौकटीच्या बाहेर जाऊन जरी करता आला तरी तो करावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -