Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीKangana Ranaut : अखेर कंगना भाजपकडून निवडणूक लढवणार!

Kangana Ranaut : अखेर कंगना भाजपकडून निवडणूक लढवणार!

कंगनाच्या वडिलांनीच केली पुष्टी

मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) उत्तम अभिनेत्रींमध्ये कंगना रनौतचे (Kangana Ranaut) नाव घेतले जाते. कंगनाने आजवर आपल्या अनेक सिनेमांमधून दमदार भूमिका केल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून आपल्या वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिची बरीचशी वक्तव्ये राजकीय (Political Statements) असल्याने कंगना राजकारणात उतरणार की काय अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. आता या शंकेला कंगनाच्या वडिलांनीच पुष्टी दिली आहे. त्यामुळे कंगना २०२४ मध्ये भाजपकडून (BJP) लोकसभेसाठी (Loksabha) निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत.

कंगनाचे वडील अमरदीप रनौत यांनी कंगनाच्या राजकीय प्रवेशाविषयी विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपने कंगनाला निवडणुकीचं तिकीट दिल्यास ती निवडणूक लढवण्यास तयार आहे. भाजप कंगनाला हिमाचल, महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्याची शक्यता तिच्या वडिलांनी वर्तवली आहे. याशिवाय भाजपने कंगनाला हिमाचलमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यास मंडी लोकसभा मतदारसंघ हे तिचे कार्यक्षेत्र असेल.

कंगनाने घेतली जेपी नड्डांची भेट

कंगनाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांची काही महिन्यांतच तिसर्‍यांदा भेट घेतली. रविवारी झालेल्या या भेटीत कंगनाच्या मनाली येथील निवासस्थानी नड्डा यांनी भाजपच्या इतर नेत्यांसोबत नाश्ताही केला होता. त्यामुळे कंगनाच्या भाजपमधील प्रवेशावर चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता वडिलांनीही पुष्टी दिल्याने कंगना लोकसभा निवडणूक लढवताना दिसण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -