‘अक्षत: कलश यात्रा’ चे नवी मुंबईत स्वागत

Share

नवी मुंबई : अयोध्यावरून आलेल्या पवित्र ‘अक्षत: कलश यात्रा’ चे नवी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्यावतीने जय श्रीराम घोषणेत, शंख नाद करत, पवित्र मंत्रोच्चारात स्वागत करण्यात आले.

अयोध्यामध्ये भव्य श्रीराम मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी श्री राम लला यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या अभूतपूर्व कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि अक्षता घरोघरी वितरित करण्यात येणार आहे.

‘अक्षत: कलश यात्रा’ चे स्वागत करण्यासाठी माजी खासदार संजीव नाईक, भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नवी मुंबई महापालिकेचे माजी सभागृहनेता रवींद्र इथापे, भाजपाचे महामंत्री सुरज पाटील, अनंत सुतार, महामंत्री शशिकांत राऊत, महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित मेढकर, महिला अध्यक्ष माधुरी सुतार, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी सांगितले की, नवी मुंबईतील तमाम जनता मंगल कलशाचे स्वागत करत आहे. अक्षत: कलश प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिरात जाईल. लोकांमध्ये उत्साह आहे, जोश आहे. हे फक्त कलशाचे दर्शन आहे. मंदिराचे दर्शन अजून बाकी आहे. येणाऱ्या काळात सगळे काही पहायला मिळेल. नवी मुंबईच्या जनतेला सांगेन की, या आणि कलशाचे दर्शन घ्या. राममंदिराचे उद्घाटन २२ तारखेला होणार आहे. परंतु दर्शनाचा लाभ आताच मिळेल. युद्धानंतर प्रभू रामचंद्र परतले होते. तेव्हा दिवाळी साजरी करण्यात आली होती. आता विश्वात दिवाळी साजरी होणार आहे. आता २२ जानेवारीची प्रतिक्षा आणि आतुरता आहे.

Recent Posts

Mumbai Rains : पावसाचा आमदार आणि मंत्र्यांनाही फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांना ट्रॅकवरून चालण्याची नामुष्की

मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रस्तेवाहतुकीसह…

13 mins ago

पुण्यात पून्हा हिट अँड रन; भरधाव कारने दोन पोलिसांना उडवले; एकाचा मृत्यू, एक गंभीर

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडले आहे. पुण्यात गस्त घालणा-या पोलिसांच्या…

43 mins ago

Rain Alerts : कोकणातही कोसळधार ‘रेड अलर्ट’ जारी

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्घ जिल्ह्यात जोरदार पाऊस जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी, खेड, चिपळूण, महाड, दापोली या…

49 mins ago

Mumbai Rain: मुंबई तुंबली! सर्व शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी

मुंबई : मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा…

3 hours ago

Rain Updates : मुंबईत कोसळधार! लाईफलाईन ठप्प, रस्त्यांवर पाणीच पाणी

मुंबई : मुंबई आणि उपनगरांत रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचले…

3 hours ago