Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीSalim Kutta case : बडगुजरांचा गॉडफादर भांडुपचा संजय राऊत!

Salim Kutta case : बडगुजरांचा गॉडफादर भांडुपचा संजय राऊत!

आमदार भरत गोगावले यांचा दावा

नागपूर : भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी देशद्रोही सलीम कुत्तासोबत (Salim Kutta) ठाकरे गटाचे नाशिकचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा ‘मैं हूँ डॉन’ या गाण्यावर नाचत असलेला व्हिडीओ शेअर केला आणि खळबळ उडवून दिली. या प्रकरणी आज सलग चौथ्या दिवशी बडगुजर यांची एसीबीमार्फत (ACB) चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी एक महत्त्वाचा दावा केला. ‘बडगुजरांचा गॉडफादर भांडुपचे संजय राऊत आहेत’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

भरत गोगावले म्हणाले, ‘या प्रकरणाचे धागेदोरे भांडुप कांजुरमार्गच्या जवळ जातील. याचं कारण म्हणजे कोणाचा कोणीतरी पाठीराखा असतो, त्याप्रमाणे बडगुजरांच्या मागे संजय राऊत दिसतायत. चौकशीअंती हे स्पष्ट होईलच. त्यात राऊतांचा सहभाग असेल तर त्यांची चौकशी होईलच. त्यांना १०० टक्के याबद्दल माहित होतं, त्याशिवाय हे घडूच शकणार नाही. बडगुजरांना पाठीशी घातलं गेलंय कारण त्याशिवाय एवढं कोणी बोलू शकत नाही किंवा नाचू शकत नाही’ असा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, सुधाकर बडगुजर यांचे दोन साथीदार बडगुजर अँड कंपनीचे भागीदार साहेबराव रामदास शिंदे आणि सुरेश भिका चव्हाण यांचीदेखील एसीबी चौकशी करणार आहे. एसीबीकडून झाडाझडतीही केली गेली आहे आणि त्यात काही महत्त्वाची कागदपत्रं जप्त केली गेली आहेत. पदाचा गैरवापर करत पालिकेची फसवणूक केल्याचा ठपका बडगुजर यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -