Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Raj Thackeray : धारावीबाबत उद्धव ठाकरेंना आता कशी काय जाग आली?

Raj Thackeray : धारावीबाबत उद्धव ठाकरेंना आता कशी काय जाग आली?

मविआच्या मोर्चावर राज ठाकरेंचा टोमणा


मुंबई : धारावी येथील झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे (Dharavi redevelopment) काम अदानी समूहाला (Adani group) देण्यात आले आहे. मात्र धारावीच्या विकासाला उद्धव ठाकरे गटासह मविआने (MVA) विरोध दर्शवला आहे. यासाठी त्यांनी मोर्चादेखील काढला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मविआच्या या मोर्चाला टोमणा मारला आहे. 'जाहिरात येऊन ८-१० महिने झाले, मग उद्धव ठाकरेंना आता का जाग आली?', असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीबाबत घेतलेल्या आढावा बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं.



सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला का?


राज ठाकरे म्हणाले, जाहिरात येऊन ८-१० महिने झाले मग आज मोर्चा का काढला? सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? कशासाठी मोर्चा काढला? १० महिन्यांनी जागे झालेल्या महाविकास आघाडीने धारावीत नेमके काय होणार हा प्रश्न विचारला का? मोर्चाचे दबाव आणून सेटलमेंट करायचे आहेत का हे मविआ नेत्यांना विचारा, असं राज ठाकरे म्हणाले.



सर्व मोठे प्रकल्प अदानींनाच कसे मिळतात?


तसेच सर्व मोठे प्रकल्प अदानींनाच कसे मिळतात यावरही राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, मुंबईत जो मोठा प्रकल्प येतो तो परस्पर अदानींना का दिला जातो? अदानींकडे असं काय आहे, म्हणजे विमानतळ, कोळसा, खाणी यासारख्या बाकीच्या गोष्टी तेच हाताळू शकतात? एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी टाटांसारख्या अनेक बड्या कंपन्यांकडून तुम्ही टेंडर मागवायला हवी होती. डिझाईन मागवायला हवे होते. तिथे नेमके काय होणार हे कळायला हवे होते पण हे झाले नाही. मी बीडीडी चाळीच्या इथं पाहणीला गेलो होतो तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर मी विचारलं होतं, तिथे शाळा किती, रस्ते कसे होणार, किती इमारती होणार, टाऊन प्लॅनिंग काय आहे हे सांगावं लागते. एक मोठा भाग घेतला आणि अदानींना दिला असं थोडी असते, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.


Comments
Add Comment