Wednesday, July 24, 2024
Homeक्रीडाcricketers marriage: २०२३मध्ये जगातील या १० क्रिकेटर्सनी केले लग्न, इतके आहेत भारतीय...

cricketers marriage: २०२३मध्ये जगातील या १० क्रिकेटर्सनी केले लग्न, इतके आहेत भारतीय क्रिकेटर

मुंबई: २०२३ या वर्षात अनेक क्रिकेटर्सना(cricketers) आपला जोडीदार मिळाला आणि ते लग्नबंधनात अडकले. २०२३ हे वर्ष क्रिकेटर्ससाठी लग्नासाठीचे वर्ष ठरले. जगभरातील अनेक स्टार्स क्रिकेटर्सनी या वर्षात लग्नगाठ बांधली. आम्ही असे १० क्रिकेटर्स सांगणार आहोत ज्यांनी या वर्षी लग्न केले. यात ७ भारतीयांचा समाेवश होते.

केएल राहुल

भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज केएल राहुलने वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी २०२३मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केले. अथिया सुनील शेट्टीची मुलगी आहे.

शार्दूल ठाकूर

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरनेही जानेवारीमध्ये लग्न केले. शार्दूलने मिताली पारूळकर हिच्याशी लग्न केले होते. त्याने दोन वर्षांपूर्वी साखरपुडा केला होता.

अक्षऱ पटेल

भारताचा स्टार ऑलराऊंडर अक्षर पटेलनेही या वर्षीच्या जानेवारी महिन्यात लग्न केले होते. अक्षऱने आपली गर्लफ्रेंड मेहा पटेल हिच्याशी लग्न केले.

मुकेश कुमार

भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान २८ नोव्हेंबरला लग्न केले. मुकेशने लग्नासाठी मालिकेतील एका सामन्यात सुट्टी घेतली आणि पुन्हा तो मालिकेत परतला.

ऋतुराज गायकवाड

टीम इंडियाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने या वर्षी जूनमध्ये लग्न केले होते. गायकवाडने उत्कर्षा हिच्याशी लग्न केले.

इमाम उल हक

पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज इमाम उल हकनेही यावर्षी लग्न केले. इमामने आपली मैत्रीण अनमोल महमूदशी नोव्हेंबरमध्ये लग्न केले होते.

शादाब खान

पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर शादाब खाननेही यावर्षी लग्न केले. शादाबने पाकिस्तानचे माजी स्पिनर सकलैन मुश्ताक यांच्या मुलीशी जानेवारीमध्ये लग्न केले होते.

गेराल्ड कोएत्जी

दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जीने नुकतेच लग्न केले. २३ वर्षीय कोएत्जी डिसेंबर महिन्यात लग्न बंधनात अडकला होता.

प्रसिद्ध कृष्णा

भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णानेही यावर्षी लग्न केले.कृष्णाने जून महिन्यात रचनाशी लग्न केले.

नवदीप सैनी

भारताचा आणखी एक वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनेही यावर्षी लग्न केले. त्याने नोव्हेंबर महिन्यात गर्लफ्रेंड स्वाति अस्थानाशी लग्न केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -