Tuesday, July 1, 2025

‘बिग बी’ उतरले क्रिकेटच्या मैदानात

‘बिग बी’ उतरले क्रिकेटच्या मैदानात

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे बनले मालक


मुंबई : शाहरुख खान आणि प्रिती झिंटानंतर अक्षय कुमारनेही क्रिकेट टीम खरेदी केली. आता अमिताभ बच्चन यांनी देखील इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजेच ‘आयएसपीएल’ मुंबई संघ विकत घेतला आहे. बिग बींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मुंबई संघाचा मालक होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या उपक्रमाचा उत्साह चिरंतन राहो... जय हो! जय हिंद.’


‘आयएसपीएल’चे सामने २ ते ९ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहेत. या स्पर्धेत सद्ध्या सहा संघ सहभागी होत असून, त्यात मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता, श्रीनगर या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेचे सर्व सामने फक्त मुंबईत खेळवले जातील.




Comments
Add Comment