मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा(actress tanuja) यांना १८ डिसेंबरच्या संध्याकाळी तब्येत बिघडल्याने मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले. त्या ८० वर्षांच्या आहेत. त्यांना मुंबईच्या जुहू येथील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, आता अभिनेत्रीच्या तब्येतीत सुधारणा आहे. त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.
अभिनेत्री शोभना समर्थ यांची मुलगी आहे तनुजा
पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री तनुजा यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची तब्येत सुधारत आहे. चिंतेची कोणतीही बाब नाही. दरम्यान, चाहत्यांना आता कुटुंबाकडून अधिकृत विधानस येण्याची प्रतीक्षा आहे. अभिनेत्री तनुजा या सिनेनिर्माता कुमारसेन समर्थ आणि अभिनेज्ञी शोभना समर्थ यांची मुलगी आहेत. त्यांनी हिंदी शिवाय बंगाली सिनेमात काम केले आहे.
अभिनेत्री तनुजा यांनी शोमू मुखर्जी यांच्याशी लग्न केले होते. त्यांना दोन मुली आहेत काजोल आणि तनीषा मुखर्जी.
अनेक हिट सिनेमांत केले आहे काम
तनुजाने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला १९५०मधील सिनेमा हमारी बेटीने सुरूवात केली होती. त्यानंतर १९६१मध्ये आलेला सिनेमा हमारी याद आएगीमध्ये त्या पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. त्यांनी बहारें फिर आएंगी, ज्वेल थीफ, पैसा या प्यार आणि हाथी मेरे साथी या सारख्या यशस्वी सिनेमांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री तनुजा सप्टेंबरमध्ये ८० वर्षांच्या झाल्या होत्या.