नवी दिल्ली: लोकसभेनंतर(loksabha) राज्यसभेचे(rajyasabha) ४५ विरोधी पक्षातील खासदारांचे सोमवारी निलंबन करण्यात आले. निलंबित केलेल्या खासदारांमध्ये प्रमोद तिवारी, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, रामनाथ ठाकूर, मनोज झा, रामगोपाल यादव, जावेद अली खान, महुआ माजी आणि शांतनू सेन आहेत.
सोबतच निलंबित केलेल्या खासदारांच्या यादीत समीरूल इस्लाम, फैयाज अहमद, अजित कुमार, ननरायन भाई जेठवा, रंजीत रंजन, रणदीप सुरजेवाला, रजनी पाटिल, एम संगम्म, अमी याग्निक, फुलो देवी नेताम आणि मौसन नूर आहेत. या ४५ खासदारांपैकी ३४ खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत आणि ११ खासदारांना प्रिव्हिलेज कमिटीचा रिपोर्ट येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
निलंबनाचे काय आहे कारण?
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड याबाबत म्हणाले, काही खासदारांनी सभागृहात गदारोळ घातला. यामुळे सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. या कारणामुळे अनेक खासदारांना सदनातून निलंबित करण्यात आले आहे.
लोकसभेतून हे खासदार निलंबित
याआधी लोकसभेतून ३३ विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्यात आले होते. यातील ३० सदस्यांना हिवाळी अधिवेशनाचा उरलेला कालावधी तर तीन इतर सदस्यांना विशेषाधिकार समितीचा रिपोर्ट येईपर्यंत निलंबित करण्यात आले.
अधीर रंजन चौधरी, अपूर्वा पोद्दार, के वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगत रॉय, शताब्दी रॉय, असिथ कुमार मल, कौशलेंद्र कुमार, एनटो एंटनी, एसएस पलनामनिक्कम, तिरूवरूस्कर, प्रतिमा मंडल, काकोली घोष,के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस राम लिंगम, के सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगोई, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद वसीर, जी सेलवम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमती. के नवासकानी आणि टी आर बालूला निलंबित करण्यात आले.