Sunday, July 14, 2024
HomeदेशMPs suspended from Lok Sabha : लोकसभेचे ३३ खासदार निलंबित!

MPs suspended from Lok Sabha : लोकसभेचे ३३ खासदार निलंबित!

याआधीही केलं १३ खासदारांना निलंबित; काय आहे कारण?

नवी दिल्ली : संसदेचं (Sansad) कामकाज चालू असताना १३ डिसेंबर रोजी दोन तरुणांनी घुसखोरी करत स्मोक कँडल्स जाळल्या. त्यामुळे संसद सुरक्षेवर (Sansad Security) मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. याच मुद्दयावरुन आज लोकसभा (Loksabha)आणि राज्यसभेत (Rajyasabha) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत दोन्ही सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी निवेदन देण्याची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. त्यामुळे संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या ३३ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) आणि इतर प्रमुख खासदारांचा समावेश आहे.

संसदेत आज झालेल्या गोंधळानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी पक्षांच्या ३३ खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. संसदेच्या कामकाजात अडथळे आणल्याप्रकरणी अध्यक्षांनी गोंधळ घालणाऱ्या ३३ खासदारांना निलंबित केलं. त्यानंतर संसदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत कल्याण बॅनर्जी, ए. राजा, थिरु दयानिधी मारन, अपूर्वा पोद्दार, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद बसीर, जी सेल्वम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमती, के नवासकानी, एनके प्रेमचंद्रन, सौगत रॉय, शताब्दी रॉय, कौशलेंद्र कुमार, अँटोनी कुमार, एस एस प्लानिमनिक्कम, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस रामा लिंगम, के सुरेश, अमर सिंह, टीआर बालू, तिरुनावुरुकरसर, गौरव गोगोई, राजमोहन उन्नीथन, के वीरस्वामी आणि असिथ कुमार मल यांना निलंबित करण्यात आले. तर विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत के जयकुमार, विजय वसंत आणि अब्दुल खालिक यांना निलंबित करण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी १३ खासदारांना निलंबित केलं

याआधीही लोकसभेतील १३ विरोधी खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यात काँग्रेसचे टीएन प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या हरिदास, डीन कुरियाकोसे, व्हीके श्रीकंदन, बेनी बेहानन, मोहम्मद जावेद आणि मनीकोम टागोर यांचा समावेश आहे. द्रमुकच्या कनिमोळी, सीपीआय(एम)चे एस वेक्शन आणि सीपीआयचे के. हे सुब्बारायन यांचाही यात समावेश आहे. तर टीएमसी सदस्य डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -