केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये कांचनगाव, काळुस्ते व तळोघ शाळांचे वर्चस्व
बेलगाव कुऱ्हे : जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा अतंर्गत तालुक्यातील काळुस्ते केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांना मोठ्या उत्साहात सुरूवात करण्यात आली. केंद्रातील जिल्हा परिषद प्रथामिक शाळा कांचनगाव येथे केंद्रस्तरीय क्रीडा व निरपण शाळेत सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन मोठया उत्साहात करण्यात आले. काळुस्ते केंद्रातील बारा शाळांमधील सुमारे ३५० ते ४५० खेळाडू व स्पर्धकांनी यात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. या स्पर्धात सर्व प्रकारात कांचनगाव, तळोघ व काळुस्ते या जिल्हा परिषद शाळांनी विविध क्रीडा व सांस्कृतिक प्रकारात बक्षिसे पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती वैजयंता घारे, गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील, विस्ताराधिकारी किशोर सोनवणे, सरपंच जाईबाई भले,उपसरपंच शारदा साळवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ घारे, बाळु कोरडे, ताराबाई डिगे, वाळु भले, विठ्ठल घारे, केंद्रप्रमुख विजय पगारे, आकाश भले, मुख्याध्यापिका विश्रांती वेताळ, दगडुसिंग परमार, हरिश्चंद्र दाभाडे, दत्ता साबळे, कैलास सुर्यवंशी, पराग कोकणे, नामदेव साबळे यांच्यासह केंद्रातील सर्व सहभागी स्पर्धक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंदप्रमुख विजय पगारे यांनी केले. यावेळी विविध खेळांबाबत माहिती देऊन सर्व खेळाडूंना खेळाची शपथ दिली. या स्पर्धेत कांचनगाव, काळुस्ते, कुरुंगवाडी, भरवज, निरपण, औचितवाडी, फोडसेवाडी, ठाकुरवाडी, दरेवाडी, तळोघ या शाळांनी सहभाग घेतला. यात सुमारे सुमारे ४०० ते ४५० खेळाडू व स्पर्धकांनी यात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.
स्पर्धा व बक्षिस वितरण कार्यक्रम भरवज व निरपण शाळेत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक गणपत घारे, संजय भांबेरे, मनोज सोमवंशी, सुकदेव गोडे, मिलींद खादे, धोंड रोंगटे, सुरेखा गुंजाळ, दिपाली मोरे, कांता खादे, अनिता शिरसाट, मिना ठोके, सुधाकर बावीस्कर, मनिषा चौधरी यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व ट्रॉफीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ता साबळे यांनी तर संजय भांबेरे व कैलास सुर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले.