Sunday, May 25, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Suresh Lad : तीन वेळा राष्ट्रवादीचे आमदार राहिलेले सुरेश लाड भाजपवासी

Suresh Lad : तीन वेळा राष्ट्रवादीचे आमदार राहिलेले सुरेश लाड भाजपवासी

नागपूर येथे चंद्रशेखर बावनकुळे व देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला पक्ष प्रवेश


कर्जत : कर्जत तालुक्यातील अतिशय मनमिळावू आणि शांत स्वभावाचे असे माजी आमदार सुरेश लाड ह्यांनी कर्जत खालापूर विधानसभेचे तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून नेतृत्व केले आहे. राष्ट्रवादी पक्षात पडलेली फूट यामुळे माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपवासी होण्याचे निश्चित केले होते. दिवाळी मध्ये हा पक्ष प्रवेश देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार होता परंतु वरिष्ठ नेत्यांच्या तारखा न जुळल्याने हा पक्ष प्रवेश लांबला होता. १६ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन असल्याने सर्व वरिष्ठ नेते तिथे उपस्थित राहणार होते म्हणूनच कर्जत येथून सर्व ज्येष्ठ भाजपचे नेते यांसह सुरेश लाड यांनी नागपुरात जाऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.


या प्रवेश सोहळ्याला महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रविंद्रजी चव्हाण, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, चित्राताई वाघ, आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.


हा पक्ष प्रवेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाला असून सदर प्रवेशावेळी रायगड जिल्ह्यातून पनवेलचे आमदार मा. प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, दक्षिण रायगडचे सरचिटणीस सतीश धारप, रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर, रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, फ्रेंड्स ऑफ बीजेपी रायगड संयोजक नितीन कांदळगावकर, रायगड जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर, कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


यावेळी प्रवेश करताना माजी आमदार सुरेश भाऊ लाड, माजी सभापती खालापूर पंचायत समिती नरेश पाटील, शेकाप तालुका चिटणीस खालापूर तालुका संदीप भाऊ पाटील, राष्ट्रवादी तालुका महिला अध्यक्ष श्वेता मनवे, रायगड जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी तानाजी चव्हाण, शरद भाऊ लाड, राजेश दादा लाड, ओबीसी तालुका अध्यक्ष विजय हजारे, राजू हजारे, जगदीश भाऊ ठाकरे, माजी सरपंच वेणगाव देविदास बडेकर, ज्येष्ठ उद्योगपती रामशेठ राणे, बिलाल आढाल, माजी शहराध्यक्ष नंदकुमार लाड, सागर शेठ शेळके, उपसरपंच होणाड समीर देशमुख, कृष्णा जाधव यांनी भाजपात सर्वांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला.

Comments
Add Comment