Saturday, October 5, 2024
Homeताज्या घडामोडीमेट्रोचे दरवाजे बंद होताच अडकली साडी, स्टेशनवर पडलेल्या महिलेचा रुग्णालयात मृत्यू

मेट्रोचे दरवाजे बंद होताच अडकली साडी, स्टेशनवर पडलेल्या महिलेचा रुग्णालयात मृत्यू

नवी दिल्ली: दिल्ली मेट्रोच्या(delhi metro) इंद्रलोक स्टेशनवर झालेल्या एका अपघातात महिलेचा शनिवारी मृ्त्यू झाला. ३५ वर्षीय महिला इंद्रलोक स्टेशनवर मेट्रो ट्रेनखाली आली. महिलेची साडी मेट्रोच्या दरवाज्यात अडकल्याने हा अपघात झाला. यानंतर महिला खाली पडली. ही घटना तेव्हा घडली जेव्हा मेट्रोचे दरवाजे बंद होत होते.

दुर्घटनेनंतर मेट्रो अधिकाऱ्यांनी जखमी अवस्थेत महिलेला सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होते. येथे शनिवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रीना असे या महिलेचे नाव आहे.

तिच्या साडीचा भाग मेट्रोच्या दरवाजात अडकला होता. दरम्यान, हे समजू शकलेले नाही की ती महिला मेट्रोतून खाली उतरत होती की चढत होती.

इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर घडली होती घटना

दिल्ली मेट्रोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनुज दयाल म्हणाले, गुरूवारी इंद्रलोक स्टेशनवर ही घटना घडली होती. एका महिला प्रवाशाचे कपडे मेट्रोच्या दरवाजात अडकले. त्यानंतंर ती या अपघातात जखमी झाली. यात शनिवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त या घटनेचा तपास करतील. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दरम्यान, या घटनेत कोणतीही केस दाखल करण्यात आलेली नाही.

महिलेच्या पतीचा सात वर्षांपूर्वी मृत्यू

पोलीस या घटनेचा तपास करत आहे आणि गरज पडल्यास कायदेशीर सल्लाही घेतला जाईल. महिलेचे नातेवाई विक्कीने सांगितले की त्या पश्चिम दिल्लीच्या नांगलोई येथून मोहन नगरला जात होत्या. जेव्हा त्या इंद्रलोक स्टेशनवर पोहोचल्या आणि ट्रेन बदलत होत्या तेव्हा त्यांची साडी अडकली. ती पडली आणि गंभीररित्या जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी संध्याकाळी तिचा मृत्यू झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -