
देवळा : देवळा शहरातील महाविद्यालय परिसरात असलेल्या एका कॅफे हाऊस मध्ये देवळा पोलिसांनी छापा टाकला असून याठिकाणी काही तरुण तरुणी अश्लील चाळे करताना आढळून आल्याने पोलिसांनी कॅफे सांचालकावर कारवाई केली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली असून, पालकांनी याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन सपोनि दीपक पाटील यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येत असतात. महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफे हाऊस मध्ये तरुण तरुणी चहा कॉफी पिण्यासाठी जात असतात परंतु काही कॅफेत मात्र चहा हॉटेलचे नावाखाली वेगळेच कारनामे करताना आढळून येत आहे.
देवळा येथील महाविद्यालय परिसरात सटाणा - रस्त्यावर डी एस पी बासुंदी नामक चहाचे हॉटेल असून यामध्ये एका रूममध्ये जोडप्यांना जास्तीचे पैसे घेऊन जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची व अश्लील चाळे होत असल्याची गोपनीय माहिती देवळा पोलिसांच्या हाती लागताच शनिवारी दि. १६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस नाईक बच्छाव, ज्योती गोसावी यांच्या पथकासह नमूद कॅफेवर छापा टाकला, त्यावेळी तिथे एक जोडपे बसून अश्लील चाळे करत असताना आढळून आले.पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून हॉटेल मालक प्रशांत उत्तम आहेर यांच्यावर भा दं वि कलम १२९, १३१ क मुंबई पोलीस कायदा अन्वये कारवाई केली.
नमूद कॅफेच्या आत एक एक छोटीशी रूम व टेबल खुर्च्या ठेवलेल्या आढळून आल्या. सदर ठिकाणी काही जोडपे येऊन त्यांचा निवांत वेळ घालवत असतात .सदर कारवाईने अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांचे धाबे दणाणले असून सदर कारवाईने देवळा महाविद्यालयीन शिक्षकांनी व पालकांनी समाधान व्यक्त केले.यानंतर कुठले हॉटेल किंवा इतर दुकानात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.असा प्रकार आढळून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली .