Monday, March 24, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलकविता आणि काव्यकोडी

कविता आणि काव्यकोडी

कविता : एकनाथ आव्हाड 

कशात काय? 

सिंहाचे सामर्थ्य
सांगा बरं कशात?
सिंहाचे सामर्थ्य
धारदार दातात

हत्तीचे बळ
सांगा बरं कशात?
हत्तीचे बळ
त्याच्या लांब सोंडेत

बैलाची शक्ती
सांगा बरं कशात?
बैलाची शक्ती
त्याच्या मोठ्या शिंगात

माणसाची ताकद
सांगा बरं कशात?
माणसाची ताकद
त्याच्या हुश्शार डोक्यात

हुश्शार डोक्याचं
गुपित काय?
पुस्तकाशिवाय
दुसरं आहेच काय!

पुस्तकं करतात
डोक्याला सुपीक
हुश्शारीचं येतं मग
हमखास पीक !

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड

१) पाणथळ जागी,
तो रोजच दिसे
मासे खाताना,
चोचीत हसे

पांढरा पोशाख,
शोभतो खूप
समाधी लावून कोण,
बसतो चूप?

२) नवी जुनी तो,
गाणी गाई
घर मजेने,
ऐकत राही

छोट्या-मोठ्यांची,
आवड जपतो
मनोरंजनाचे,
काम कोण करतो?

३) सूर्यनारायण,
हळूच डोकावतो
पाखरांचा,
किलबिलाट होतो

स्वागतास उभी
सृष्टी सारी
लख्ख प्रकाशात
कोण येई दारी?

उत्तर –
१) बगळा
२) रेडिओ
३) पहाट 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -