Maratha Reservation : मराठा आंदोलनाची पुढील दिशा आता 'या' तारखेला ठरवणार!

आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे यांची घोषणा


जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा महाराष्ट्र दौरा पूर्ण झाला असून आज ते जालना (Jalna) येथील आंतरवाली सराटी गावातून मराठा आंदोलनाची पुढील दिशा सांगणार होते. मात्र, ही तारीख आता त्यांनी पुढे ढकलली आहे. त्यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी मुदत दिली आहे. त्यामुळे त्याआधी २३ डिसेंबरला जरांगे बीड येथे जाहीर सभा घेऊन मराठा आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे आधी त्यांची भूमिका कळली पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. ते म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत. २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठाम असल्याचा निरोप देण्यात आला आहे. आपण काय आंदोलन करणार आहोत हे आजच सांगितल्यास सरकारला कळून जाईल. आता लढाई ताकदीने आणि युक्तीने देखील लढाईची. उद्या सरकारला त्यांची भूमिका जाहीर करू द्यावी, अन्यथा तुम्ही आधीच जाहीर करून टाकल्याचं ते म्हणतील, असं जरांगे म्हणाले.


बीडमध्ये २३ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक, बीड बायपास मांजरसुंबा रोड येथे मराठा समाजाची सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, तब्बल ५० एकरमध्ये ही सभा होणार आहे. या सभेसाठी ४० एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. या सभेच्या नियोजनासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बैठका देखील झाल्या आहेत. मात्र, आता आंदोलनाची दिशा याच सभेत ठरवली जाणार असल्याने या सभेला अधिक महत्व प्राप्त झाले आहेत.

Comments
Add Comment

Jalgoan Crime : बाप की कसाई? जळगावात चौथी मुलगी झाली म्हणून ३ दिवसांच्या चिमुकलीची पाटाने ठेचून हत्या, जळगाव हादरलं!

जळगाव : मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने केवळ

दोन वाहनांच्या धडकेत जिवगल मैत्रिणींचा नाहक बळी

सोलापूर: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातावर हळहळ व्यक्त होत आहे. कारण या

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा