Thursday, October 10, 2024
Homeमहत्वाची बातमीMaratha Reservation : मराठा आंदोलनाची पुढील दिशा आता 'या' तारखेला ठरवणार!

Maratha Reservation : मराठा आंदोलनाची पुढील दिशा आता ‘या’ तारखेला ठरवणार!

आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे यांची घोषणा

जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा महाराष्ट्र दौरा पूर्ण झाला असून आज ते जालना (Jalna) येथील आंतरवाली सराटी गावातून मराठा आंदोलनाची पुढील दिशा सांगणार होते. मात्र, ही तारीख आता त्यांनी पुढे ढकलली आहे. त्यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी मुदत दिली आहे. त्यामुळे त्याआधी २३ डिसेंबरला जरांगे बीड येथे जाहीर सभा घेऊन मराठा आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे आधी त्यांची भूमिका कळली पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत. २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठाम असल्याचा निरोप देण्यात आला आहे. आपण काय आंदोलन करणार आहोत हे आजच सांगितल्यास सरकारला कळून जाईल. आता लढाई ताकदीने आणि युक्तीने देखील लढाईची. उद्या सरकारला त्यांची भूमिका जाहीर करू द्यावी, अन्यथा तुम्ही आधीच जाहीर करून टाकल्याचं ते म्हणतील, असं जरांगे म्हणाले.

बीडमध्ये २३ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक, बीड बायपास मांजरसुंबा रोड येथे मराठा समाजाची सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, तब्बल ५० एकरमध्ये ही सभा होणार आहे. या सभेसाठी ४० एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. या सभेच्या नियोजनासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बैठका देखील झाल्या आहेत. मात्र, आता आंदोलनाची दिशा याच सभेत ठरवली जाणार असल्याने या सभेला अधिक महत्व प्राप्त झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -