Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीNewspaper sellers : वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळच करा

Newspaper sellers : वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळच करा

आमदार संजय केळकर यांची विधानसभेत मागणी

नाशिक : राज्यातील सुमारे अडीच लाखाच्या घरात असणार्‍या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी (Newspaper sellers) राज्य सरकारने स्वतंत्र कल्याणकारी मंडळच करावे अशी ठोस मागणी भाजपचे ठाण्याचे आमदार, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांनी विधानसभेत केली. दरम्यान सरकार वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करण्यासाठी सकारात्मक असुन लवकरच त्याबाबत मार्ग काढू असे आश्‍वासन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केळकर यांना भेटीदरम्यान दिले.

याबाबत बोलताना आमदार श्री. केळकर म्हणाले, लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्‍या वृत्तपत्रांमध्ये वृत्तपत्र विक्रेता हा महत्वाचा घटक आहे. वारा-पाऊस-थंडी, कोरोना, महापूर अशा कोणत्याही संकटाची तमा बाळगता जगाच्या कानाकोपर्‍यातील बातम्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. मात्र हा घटक अनेक दिवसांपासून मुलभूत गरजांपासून दूर आहे. वेळी-अवेळीचे काम, विश्रांतीचा अभाव, पुरेशा उत्पन्नाचा अभाव यामुळे आयुष्य खडतरीचे असते. त्यातच उतारवयात काम थांबले की जगण्याचेही अवघड होते. अशा संकटावर मात करत वृत्तपत्र विक्रेत्यांचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी गेली अनेक वर्षे वृत्तपत्र विक्रेते कल्याणकारी मंडळाची मागणी करत आहेत. त्यांचा हाच प्रश्‍न मी अनेक दिवसांपासून हातात घेतला आहे, त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे.

विधानसभेत आ. केळकर यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचा हा प्रश्‍न मांडताना म्हटले, सरकारने सर्वच अंसघटित कामगारांसाठी एकच असंघटित कामगार मंडळ करून त्यामध्ये छोटीछोटी ३९ आभासी मंडळे केली आहेत. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. यामध्येच वृत्तपत्र विक्रेत्यांचा सहभाग आहे मात्र राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची एकूण संख्या मोठी आहे अडीच लाखांहुन अधिक आहे. भाजपच्या २०१४ ते २०१९ च्या सरकारच्या काळात वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळावर कामही झाले.

कल्याणकारी मंडळासाठी अभ्यासमितीही नेमण्यात आली. त्याचा अहवालही शासनास प्राप्त झाला आहे. त्यामध्येही विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाचा उल्लेख आहे. शासनाने इतरही काही स्वतंत्र मंडळे केली आहेत त्याप्रमाणे या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे, त्यासाठी लागणारा निधीचे मार्गही श्री केळकर यांनी स्पष्ट केले. हे मंडळ झाले तर खर्‍या अर्थाने वृत्तपत्र विक्रेत्यांना, त्यांच्या कुटुंबासाठी योजना राबवता येतील त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे अशी मागणी श्री केळकर यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -