Wednesday, September 17, 2025

Libya: लिबियाच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात, जहाज बुडाल्याने मुले-महिलांसह ६१ प्रवाशांचा मृत्यू

Libya: लिबियाच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात, जहाज बुडाल्याने मुले-महिलांसह ६१ प्रवाशांचा मृत्यू

लिबिया: लिबियाच्या समुद्र किनाऱ्यावर मोठा अपघात झाला आहेत. येथील समुद्र किनारी प्रवाशांनी भरलेली जहाज बुडाली. लाबियामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास संघटनेने शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले की, लीबियामध्ये एका दु:खद जहाज दुर्घटनेत महिला आणि मुलांसह ६१ प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला.

न्यूज एजन्सी रॉयटर्सनुसार, या घटनेत वाचलेल्या लोकांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार साधारण ८६ लोकांना घेऊन हे जहाज लीबियाच्या जवारा शहरातून रवाना झाली होती. लीबिया जिथे २०११मध्ये नाटो समर्थक विद्रोहानंतर खूप कमी स्थिरता तसेच सुरक्षितता आहे. समुद्राच्या रस्त्याने युरोप पोहोचण्यासाठी इच्छुक लोकांसाठी प्रमुख लाँचिंग पॉईंट आहे.

याआधीही घडल्यात अशा घटना

नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लीबियामधील सुरक्षा रक्षक जवांनांनी प्रवाशांवर कारवाई केली होती. या पद्धतीच्या घटनेत जूनमध्ये कमीत कमी ७९ प्रवासी बुडाले होते तसेच शेकडो प्रवासी गायबर झाले होते. अशी शक्यता होती की त्यांचे जहाज पलटी झाले आणि ग्रीसजवळी खुल्या समुद्रात बुडाले.

एका मीडिया रिपोर्टनुसार हे जहाज लीबियासाठी रवाना झाले होते. यात जहाजातील अधिकांश लोक इजि्प्त, सीरिया आणि पाकिस्तानातील होते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये एका वादळादरम्यान इटलीच्या कॅलाब्रियन किनाऱ्याव एक लाकडाचे जहाज लांटाना आदळले होते याक ९६ लोकांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment