Thursday, November 7, 2024
Homeक्रीडाIND vs SA: अर्शदीप-आवेशनंतर भारतीय फलंदाजांचे वादळ, एकतर्फी सामन्यात आफ्रिकेला ८ विकेटनी...

IND vs SA: अर्शदीप-आवेशनंतर भारतीय फलंदाजांचे वादळ, एकतर्फी सामन्यात आफ्रिकेला ८ विकेटनी हरवले

जोहान्सबर्ग: जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात आलेल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ८ विकेटनी हरवले. या सामन्यात आधी भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि आवेश खान यांनी कहर केला. त्यानंतर साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यरने तुफानी फलंदाजी केली. या सामन्यात आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ११६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य १७व्या ओव्हरमध्येच मिळवले.

दी वांडरर्समध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात पिचची वेगवान गोलंदाजांना साथ मिळाली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये अर्शदीप सिंहने रीजा हेंडरिक्सला बोल्ड केले. पुढील बॉलवर रासी वान डेर डुसेनलाही अर्शदीपने बाद केले. ४२ धावा झालेल्या असताना टोनी डी जॉर्जीला अर्शदीपने बाद केले. स्कोरबोर्डवर १० धावा आणखी झालेल्या असताना हेनरिक क्लासेनलाही बाद केले. त्यालाही अर्शदीपने बाद केले. या पद्धतीने पहिल्या चार विकेट अर्शदीपने मिळवल्या.

त्यानंतर आवेश खानचा कहर

अर्शदीपनंतर आफ्रिकेलाच्या संघाला आवेश खानने बॅक टू बॅक झटके दिले. ५२ धावसंख्या असताना एडन मार्करमला बोल्ड केले. पुढील बॉलवर आवेशने विआन मुल्डरला एलबीडब्लू केले. डेविड मिलररही झटपट बाद झाला. त्यालाही आवेश खानने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या पद्धतीने ५८ धावांवर आफ्रिकेच्या संघाने ७ विकेट गमावल्या होत्या.

त्यानंतर आंदिले फेहलुखवायोने एक बाजू सांभाळली. त्याने केशव महाराजसह १५ आणि नंद्रे बर्गरसोबत २८ धावांची भागीदारी केली. त्यांतर आंदिले फेहलुखवायोला अर्शदीपने बाद केले. भारतासाठी अर्शदीपने पाच, आवेश खानने चार आणि कुलदीप यादवने एक विकेट घेतला.

साई आणि श्रेयसची जबरदस्त खेळी

११७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाडला लवकर गमावले. त्याने केवळ ५ धावा केल्या. मात्र त्यानंतर श्रेयस अय्यर आणि साई सुदर्शन यांच्यात ८८ धावांची भागीदारी झाली. १११ धावसंख्या असताना श्रेयस अय्यर बाद झाला. त्याने ४५ बॉलमध्ये ५२ धावा केल्या. साई सुदर्शन ४३ बॉलवर ५५ धावा करत बाद झाला. टीम इंडियाने २ विकेट गमावत १६.४ ओव्हरमध्ये आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -