Saturday, January 18, 2025
Homeताज्या घडामोडीकेसांना महागडे तेल लावताय तर त्याऐवजी सुरू करा हे तेल, नक्की दिसेल...

केसांना महागडे तेल लावताय तर त्याऐवजी सुरू करा हे तेल, नक्की दिसेल फरक

मुंबई: आजच्या काळात केसांच्या समस्या खूप वाढत आहेत. केसांचे गळणे, कोंडा होणे यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाटी बाजारात विविध प्रकारची महागडी तेल मिळतात. मात्र अनेकदा यांचा काहीच फायदा होत नाही. याचा वापर करूनही केस गळती काही कमी होत नाही. अनेकदा तर केसांची स्थिती अधिकच बिघडते. अशातच एक चांगला पर्याय आहे ते म्हणजे राईचे तेल.

राईच्या तेलात व्हिटामिन ई, व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स, प्रोटीन, अँटी ऑक्सिडंट आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिडसारखी पोषक तत्वे आढळतात. ही सर्व पोषकतत्वे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. राईचे तेल केसांना लावल्याने केसांची वाढ होते. केसगळती कमी होते. केसांच्या समस्या जसे कोंड, खास यापासून आराम मिळतो. जाणून घेऊया केसांना राईचे तेल लावण्याचे फायदे

राईच्या तेलाने मालिश – राईचे तेल गरम करून केस आणि स्काल्पवर चांगल्या पद्धतीने मालिश करा. यामुळे केसांना पोषण पोहोचते तसेच खाजही दूर होते.

तेलाचा लेप – केसांना सरळ तेल लावून एक तासभर तसेच ठेवा. यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतील.

आठवड्यातून एक-दोन वेळा केसांना तेल मालिश – आठवड्यातून कमीत कमी एकदा केसांना मुळापासून ते खालीपर्यंत केलाने चांगला मसाज करा.

तेल आणि लिंबाचे मिश्रण – लिंबाच्या रसात थोडे राईचे तेल मिसळून लावल्याने केस अधिक मजबूत होतील आणि कोंडाही होणार नाही.

केसांना राईचे तेल लावण्याचे फायदे

केसांना राईचे तेल पोषण देण्याचे काम करते. यामुळे केस अधिक मजबूत आणि निरोगी बनतात. यामुळे केस वेगाने वाढतात.

केसांच्या मुळांना मजबुती देतात. तसेच केस पातळ होण्याची समस्या दूर होते.

केसांची गळती कमी होते. तसेच नवे केस येण्यास सुरूवात होते.

केसांना चमक येते तसेच ते मुलायम आणि कोमल बनतात.

केसांना खाज येण्याची समस्या दूर होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -