Friday, October 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : कुत्तासोबत नाचणा-या निर्लज्जांना जनताच धडा शिकवेल!

Devendra Fadnavis : कुत्तासोबत नाचणा-या निर्लज्जांना जनताच धडा शिकवेल!

ठाकरेंच्या शिलेदाराची पार्टी देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर

नागपूर : एकिकडे टेंबा मिरवत स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणायचे आणि दुसरीकडे मुंबईत बॉम्बस्फोट घडवणारा, दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबत नाचायचे.. म्हणजे जसं काही एखादा स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जेलमधून सुटून आलाय अशा प्रकारचं सेलिब्रेशन त्या ठिकाणी चाललं आहे. अरे शरम वाटली पाहिजे, अशा कठोर शब्दांत हल्लाबोल करत आम्ही तुम्हाला काही शिकवायचं सोडाच, आता जनताच तुम्हाला धडा शिकवणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे गटाला दिला. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गट, काँग्रेस तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

काल भाजप आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा सहकारी सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीचा फोटो विधानसभेत झळकावत गंभीर आरोप केले. हाच मुद्दा पकडत आज फडणवीस यांनी ठाकरे गटावर खरमरीत टीका केली.

फडणवीस पुढे म्हणाले, या दाऊदने देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले होते. मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. त्यात शेकडो बळी घेतले. शेकडो जखमी झाले. त्याच दाऊदच्या साथीदारासोबत तुम्ही त्या ठिकाणी डान्स करता. ही त्यांची अवस्था आहे. आता ही लोकं आपल्याला राष्ट्रवाद शिकवणार. हे आपल्याला हिंदुत्व शिकवणार, असा सवाल करत फडणवीस यांनी ठाकरेंना फटकारले.

ते आपले विरोधक असतील तरी पण मला दुःख आहे कारण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्यासाठी नेहमीच वंदनीय राहिले आहेत. त्यांच्यासोबत इतकी वर्ष काम करताना जो विचार त्यांनी मांडला तो विचार सोडून त्या विचारांच्या विरोधकांसोबत रोज मांडीला मांडी लावून बसायचे आणि भाषणात हिंदुत्वादी म्हणवून घ्यायचे, तुम्ही आम्हाला शिकवू नका म्हणायचे. अरे आम्ही शिकवायचे सोडाच, जनताच आता तुम्हाला धडा शिकवणार आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -