Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीShreyas Talpade : आजारपणामुळे 'वेलकम ३' मधून आऊट होणार श्रेयस तळपदे?

Shreyas Talpade : आजारपणामुळे ‘वेलकम ३’ मधून आऊट होणार श्रेयस तळपदे?

काय म्हणाली सिनेमाची टीम?

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) आणि मराठीतील (Marathi) प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) परवा रात्री हृदयविकाराचा झटका (Heart attack)आल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्या आगामी ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the jungle) म्हणजेच वेलकम चित्रपटाच्या तिसर्‍या भागाचे शूटिंग करुन घरी परतल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागलं आणि तपासणीनंतर त्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचं समजलं. सध्या त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे. शिवाय त्याला लवकरच डिस्चार्जही मिळणार आहे.

श्रेयसची प्रकृती आता ठीक असली तरी त्याला आरामाची गरज आहे. त्याच्या आजारपणामुळे शूटिंगच्या शेड्युलवर नक्कीच परिणाम होणार आहे. त्यामुळे तो आता ‘वेलकम ३’ चा भाग असणार की नाही अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण आता याबाबत शंका दूर झाल्या आहेत.

‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाचं शूटिंग ठरलेल्या वेळेतच होणार आहे. या सिनेमाची संपूर्ण टीम सध्या खूप चिंतेत आहे. काहीही झालं तरी ‘शो मस्ट शो गॉन’ असं म्हटलं जात आहे. कोणत्याही कारणाने सिनेमाचं शूटिंग थांबणार नाही. श्रेयसची प्रकृती ठिक झाल्यानंतर त्याला एकदम फिट वाटेल तेव्हाच त्याचे सीन शूट होतील”, असं सिनेमाच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे.

‘वेलकम ३’ या सिनेमाचं शूटिंग नाताळमध्ये शेड्यूल करण्यात आलं होतं. जगभरातील लोक या काळात सुट्टीवर असतात. याच गोष्टीची दखल घेत नाताळात या सिनेमाचं शूटिंग आयोजित करण्यात आलं होतं. शूटिंग संपल्यानंतर प्रत्येक जण सुट्टी आनंदात घालवू शकेल हा यामागचा हेतू होता. नव्या वर्षातही या सिनेमाचं शूटिंग होणार आहे.

‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमात अक्षय कुमार, संजय दत्त, दिशा पटानी, सुनील शेट्टी, श्रेयस तळपदे, अरशद वारसी आणि रवीना टंडन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -