कुंभमेळा समिती की राजकीय आखाडा?

  234

साधू महंतांना प्रतिनिधीत्व न दिल्याने संताप


त्र्यंबकेश्वर : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी स्थापन झालेल्या राज्य आणि जिल्हा स्तरीय समितीत साधू महंतांना स्थान न मिळाल्याने साधू महंतांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात साधू महंतांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना आपल्या भावना कळविल्या आहेत.


अलिकडेच स्थापन झालेल्या राज्यस्तरीय कुंभमेळा नियोजन समितीत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा तर जिल्हा स्तरीय समितीवर अध्यक्ष म्हणून ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पालक मंत्री दादा भुसे आणि अन्न पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना केवळ सदस्य म्हणून दुय्यम स्थान दिल्याची चर्चा असताना समितीवर स्थान न मिळाल्याने साधू महंतांमध्येही असंतोष पसरला आहे.


कुंभमेळा अवघ्या तीन वर्षावर आला असताना काहीशा उशिराने का होईना राज्य स्तरीय शिखर समिती, शासनाकडून स्थापन झाल्या आहेत. परंतु ज्यांच्यासाठी कुंभमेळा भरवला जातो त्या साधू महंतांचे प्रतिनिधीच समितीत नसल्याने प्रारंभीच जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष साधूंना वेधावे लागले.


आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज व नाशिकचे महंत भक्त चरणदास यांच्यात या मुद्द्यावर मंथन होऊन त्रंबकेश्वरचे शंकरानंद सरस्वती यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनद्वारे आपल्या संतप्त भावना कळविल्या. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर विचार करणार असल्याचे आश्वासन महंतांना दिले.


याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत आयुक्तांनाही निवेदन देऊन भावना कळविणार असल्याचे महंतांनी सांगितले.


कुंभमेळा समितीत साधूंना स्थान नसल्याने राजकीय कार्यकर्त्यांनीच हा कुंभमेळा भरवावा असा टोमणा साधुंनी संताप व्यक्त करीत लगावला.


भारतभरातील आखाड्यांची मुख्य संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महाराज यांनी याबाबत उच्च स्तरावर लक्ष वेधू असे सांगितले.


नील पर्वत वरील महंत महेंद्र गिरी, तसेच अटल आखाड्याचे महंत उदयगिरी, महामंडलेश्वर सोमेश्वरनंद महाराज, धनंजय गिरी महाराज (पंचायती निरंजन आखाड्या) सर्व साधूंकडून शासनाला निवेदन देण्यात येणार आहे.


दरम्यान त्रंबक नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीया देवचके यांचा त्र्यंबकचे प्रतिनिधी म्हणून कुंभमेळा जिल्हास्तरीय समितीत समावेश आहे. शिखर समिती मध्ये पुरोहितांचे प्रतिनिधी आहेत. मात्र साधू नाहीत अशी खंत व्यक्त करण्यात आली.

Comments
Add Comment

Crizac Limited IPO: उद्यापासून Crizac आयपीओ बाजारात दाखल होणार Price Band २३३ ते २४५ रूपये निश्चित!

प्रतिनिधी: उद्यापासून क्रिझॅक लिमिटेड (Crizac Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. ८६० कोटींचा

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत