Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीDada Bhuse : बडगुजर हा छोटा मासा... बात निकली है तो बहोत...

Dada Bhuse : बडगुजर हा छोटा मासा… बात निकली है तो बहोत दूर तक जायेगी!

दादा भुसे यांचा ठाकरे गटाला थेट इशारा

नाशिक : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे आमदार सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा देशद्रोही सलीम कुत्तासोबत (Salim Kutta) ‘मैं हूँ डॉन’ या गाण्यावरील नाचतानाचा व्हिडीओ शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या (Thackeray Group) तोंडचे पाणी पळाले आहे. सुधाकर बडगुजर यांनी या प्रकरणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे () यांच्यावर आरोप केले. आता दादा भुसेंनी देखील बडगुजरांची खिल्ली उडवत चोख प्रतिक्रिया दिली आहे. ‘बडगुजर हा छोटा मासा आहे, बात निकली है तो बहोत दूर तक जायेगी’ असं म्हणत दादा भुसे यांनी ठाकरे गटाला थेट इशारा दिला आहे.

दादा भुसे म्हणाले, “मुंबई बॉम्ब स्फोटाचा सूत्रधार सलीम कुत्ता या देशद्रोह्यासोबत नाशिक शिवसेना उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी बडगुजर फॉर्मवर पार्टी दिल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. तिथे नाचगाणे देखील झाल्याचं दिसून आलं. यामध्ये काही क्रिमिनल देखील सहभागी होते. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सुधाकर बडगुजरांना सगळ्या गोष्टींची आठवण होईल.”

पुढे ते म्हणाले, “बडगुजर यांच्या चौकशीची मागणी आमदार नितेश राणे यांनी केली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी महाराष्ट्राच्या समोर येतील. मैं हूँ डॉन वर बडगुजर हे अनेक क्रिमिनल आणि देशद्रोह्यांसोबत थिरकले याचा संपूर्ण भारतीयांना राग आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, बडगुजर यांनी भुसे यांच्यावर केलेल्या ड्रग्स प्रकरणातील आरोपांचेही मंत्री भुसे यांनी उत्तर दिले. “ललित ड्रग्स प्रकरण हे २०२०चे आहे. सुधाकर बडगुजर यांनीच त्याचा शिवसेना प्रवेश घडवून आणला होता. या प्रकरणात माझा अणु-रेणु इतकाही संबंध निघाला तरी पद आणि राजकारण सोडून देईन”, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -