Saturday, July 20, 2024
Homeक्रीडाSuryakumar Yadav: सूर्याला सामन्यादरम्यान झाली दुखापत, उचलून न्यावे लागले मैदानाबाहेर, आयपीएल खेळण्यावर...

Suryakumar Yadav: सूर्याला सामन्यादरम्यान झाली दुखापत, उचलून न्यावे लागले मैदानाबाहेर, आयपीएल खेळण्यावर संकट

मुंबई: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० संघाचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवबाबत वाईट बातमी समोर आली आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरूवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला चालताही येत नव्हते.

सूर्याला मेडिकल आणि बाकी स्टाफने उचलून मैदानाबाहेर आणले. सूर्या मैदानाबाहेर गेल्यानंतर स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने नेतृत्व केले. सूर्याने या सामन्यात शतकीय खेळी केली होती.

सूर्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथे शतक

तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात टॉस हरल्यानंतर भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २०१ धावा केल्या होत्या.संघाने २९ धावांवर दोन गडी गमावले होते. शुभमन गिल आणि तिलक वर्मा यांना केशव महाराजने बाद केले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयसवालने ७० बॉलवर ११२ धावांची पार्टनरशिप करत संघाला सांभाळले आणि मोठा स्कोर उभा करून दिला.

यशस्वीने ४१ बॉलवर ६० धावा करत बाद झाला. तर सूर्याने एकीकडे मोर्चा सांभाळला होता. त्याने ५६ चेंडूत शतकी खेळी केली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे चौथे शतक होते. सूर्याने आपल्या या खेळीदरम्यान ८ षटकरा आणि ७ चौकार ठोकले.

फिल्डिंगदरम्यान झाला दुखापतग्रस्त

यानंतर आफ्रिकेचा संघ आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरला. त्यांनी दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला विकेट गमावला होता. मात्र यानंतर काही वेळातच सूर्यासोबत अपघात घडला. बाऊंड्रीकडे फिल्डिंग करत असताना त्याचा पाय मुरगळला आणि तो जखमी झाला. बाऊंड्रीच्या दिशेने जात असलेला बॉल रोखण्यासाठी सूर्याने वेगाने धावला आणि या दरम्यान तो बॉल घेण्यासाठी वाकला. याच दरम्यान, त्याचा पाय मुरगळला आणि तो जमिनीवर बसला

तातडीने फिजिओ आणि मेडिकलची टीम मैदानावर आली आणि उपचार केले. मात्र सूर्याला आराम नाही मिळाला. त्यानंतर दुखापतीमुळे कण्हत असलेल्या सूर्याला उचलून मैदानाबाहेर आणण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -