नागपुर : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी केल्याच्या आरोपाप्रकरणी एसआयटी चौकशी होणार आहे. विधानसभेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी तपासाची घोषणा केली. देशद्रोह्यांसोबत पार्ट्या झोडल्याचा आरोप नितेश राणे यांनी सभागृहात केला होता.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत बडगुजर यांनी डान्स पार्टी केल्याचे फोटो आणि विडिओ आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवून त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली.