मुंबई: अभिनेता श्रेयस तळपदेला गुरूवारी हार्ट अॅटॅक आला होता. यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली यानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. आता अभिनेता बॉबी देओलीने श्रेयसच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. त्याने सांगितले सुमारे १० मिनिटांपर्यंत अभिनेत्याचा श्वास थांबला होता.
बॉलिवूड हंगामाशी बोलताना बॉबी देओलने सांगितले की त्याने श्रेयस तळपदेच्या पत्नीशी बातचीत केली. यात तिने सांगितले की श्रेयसचे हृदय दहा मिनिटे थांबले होते. बॉबी देओलने सांगितले, मी आताच पत्नीशी बातचीत केली. ती खरंच तणावात होती. त्याचे हृदय सुमारे १० मिनिटे थांबले होते. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि डॉक्टर्सनी त्याला पुन्हा आयुष्य दिले आहे. आता प्रार्थना करूया की तो लवकरात लवकर बरा व्हावा.
पत्नी श्रेयसने दिली होती माहिती
याआधी श्रेयस तळपदेची पत्नी दीप्तीने अभिनेत्याच्या तब्येतीविषयी सांगितले होते. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक नोट शेअर करत श्रेयसची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले. दीप्तीने लिहिले, माझ्या पतीची तब्येत बिघडल्याचे ऐकल्यानंतर तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीने मला साथ दिली यासाठी मी तुमची आभारी आहे. त्याची तब्येत आता स्थिर आहे आणि लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.