Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीShreays Talpade And Tripti Dimri : 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीला बॉलिवूडमध्ये आणलं...

Shreays Talpade And Tripti Dimri : ‘अ‍ॅनिमल’ फेम तृप्ती डिमरीला बॉलिवूडमध्ये आणलं श्रेयस तळपदेने!

काय आहे दोघांचं नातं?

मुंबई : मराठी आणि बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreays Talpade) सध्या त्याच्या आजारपणामुळे चर्चेत आला आहे. काल ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the jungle) चित्रपटाचं शूटिंग उरकून घरी परतल्यावर त्याला अचानक हृदयविकाराचा झटका (Heart attack) आला. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून लवकरच त्याला डिस्चार्जही मिळणार आहे. तर दुसरीकडे आणखी एका गोष्टीमुळे श्रेयस चर्चेत आला आहे. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेली अभिनेत्री तृप्ती डिमरीला बॉलिवूडचा रस्ता श्रेयसने दाखवला आहे. श्रेयस तळपदेच्या तृप्ती डिमरीसोबतच्या (Tripti Dimri) या गोष्टीची सध्या चर्चा रंगली आहे.

श्रेयस तळपदेने ‘पोस्टर बॉईज’ (Poster Boyz) या हिंदी सिनेमाची सहनिर्मिती व दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात सनी देओल (Sunny Deol), बॉबी देओल (Bobby Deol) आणि श्रेयस प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमात श्रेयसने तृप्तीलाही काम करण्याची संधी दिली होती. हा तिचा पहिलाच चित्रपट होता. तृप्तीने श्रेयसच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. यामुळे श्रेयस तळपदेला तृप्ती डिमरीचा गॉडफादरही म्हटले जाते.

‘अ‍ॅनिमल’ पुर्वी तृप्ती बाबिल खानसोबत ‘कला’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. यासोबत ती इम्तियाज अलीच्या ‘लैला मजनू’ या चित्रपटात दिसली. अ‍ॅनिमल चित्रपटाने तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली. तर श्रेयस तळपदेने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो खूप लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने ‘इकबाल’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’, ‘हाऊसफुल २’ आणि ‘गोलमाल अगेन’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -