जोहान्सबर्ग: भारतीय संघाने(team india) तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला तब्बल १०६ धावांनी हरवत मालिकेत १-१ शी बरोबरी साधली. या विजयानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव(surya kumar yadav) प्रचंड खुश दिसत होता. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात सूर्याच्या शतकाने मोठी भूमिका निभावली. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ दी मॅचसह प्लेयर ऑफ दी सीरिज हा अवॉर्डही देण्यात आला.
बॉलिंगमध्ये बर्थडे बॉय कुलदीप यादवने ५ विकेट मिळवल्या. याशिवाय फिल्डिंगदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यानंतर सूर्याने आपली स्थिती सांगितली. मी चांगला आहे. मी चालत आहे तर चांगला आहे. नेहमी एक चांगली फिलिंग. जेव्हा विजय मिळतो तेव्हा आनंद होतो.
भारतीय कर्णधाराने कुलदीप यादवचेही यावेळेस कौतुक केले. कुलदीपबद्दल सूर्या म्हणाला, बर्थडेच्या दिवशी पाच विकेट त्याने स्वत:ला शानदार गिफ्ट दिले. कुलदीपने केवळ २.५ षटकांत १७ धावा देत ५ विकेट मिळवल्या. कुलदीपबाबत तो म्हणाला, तो कधीच खुश नाही आहे. तो नेहमीच भुकेला आहे. हे बर्थडेसाठी चांगले गिफ्ट होते. माझ्या मते आपला खेळ जाणणे गरजेचे असते. मी फक्त गेलो आणि एन्जॉय केला.
आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला. त्यामुळे हा तिसरा सामना भारतासाठी करो वा मरो होता. या सामन्यात भारतीय संघाने २०२ धावांचे आव्हान दिले होते. सूर्यकुमार यादवने या सामन्यात ५६ बॉलमध्ये शतकी खेळी केली होती.
मात्र याला उत्तर देण्यासाठी उतरलेला आफ्रिकेचा संघ १३.५ षटकांत ९५ धावांवर गारद झाला. त्यांनी हा सामना १०६ धावांनी गमावला. या पद्धतीने भारताने मालिकेत बरोबरी साधली. आफ्रिकेसाठी सामन्यात डेविड मिलरने सर्वाधिक ३५ तर एडन मार्करमने २५ धावा केल्या.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…