Wednesday, May 7, 2025

मनोरंजन

Emraan Hashmi : इमरान हाश्मी ठरला बॉलिवूडचा सिक्वेल हीरो

Emraan Hashmi : इमरान हाश्मी ठरला बॉलिवूडचा सिक्वेल हीरो

मुंबई : बॉलीवूडचा ओजी अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा त्याच्या आकर्षक अभिनयासाठी ओळखला जातो. अभिनयाची चुणूक आणि उत्तम कामगिरीसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता सध्या सिक्वेल हिरो ठरतो आहे. एका यशस्वी सिक्वेलमधून दुसऱ्याकडे भागाकडे जाताना त्याचा अभिनय भाव खाऊन जातो.


मर्डर 2, जन्नत 2, राझ 2 आणि राज 3 च्या सिनेमॅटिक अनुभवांनंतर इमरानने आता अलीकडे रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर टायगर 3 मध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली. टायगर 3 च्या दमदार यशाने इमरान सिक्वेल चा सुपरहिरो बनला आहे. त्याने आजवर अनेक हिट फ्रँचायझी केल्या आणि तो एक उत्तम अभिनेता आहे हे दाखवून दिलं.


टायगर 3 ची क्रेझ असताना इमरान बद्दल च्या अनेक चर्चा इंडस्ट्रीत होत आहेत. जन्नत 3 आणि आवारापन 2 आता येणार का ? आणि यात इमरान भूमिका साकारणार का ? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. प्रेक्षक या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत.


टायगर 3 च्या यशाचा आनंद लुटत असताना आणि जन्नत 3 आणि आवारापन 2 च्या चर्चांना उधाण आलं आहे आणि इमरानने हे सिद्ध केले की तो केवळ एक बॉलीवूड स्टार नाही तर यशस्वी सिनेमॅटिक अनुभव देणारा अभिनेता देखील आहे.

Comments
Add Comment