Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीAamir Khan new movie : ब्रेकनंतर आमिर खान पुन्हा दिसणार क्रीडा प्रशिक्षकाच्या...

Aamir Khan new movie : ब्रेकनंतर आमिर खान पुन्हा दिसणार क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत

नव्या चित्रपटाच्या शूटिंगला २०२४ मध्ये होणार सुरुवात

मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) मेहनती अभिनेता आमिर खान (Aamir Khan) गेले अनेक दिवस चित्रपटसृष्टीपासून दूर होता. करीना कपूरसह (Kareena Kapoor) ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमात तो शेवटचा दिसला होता. आमिर खानचा २०२३ मध्ये एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. या ब्रेकनंतर आता तो २०२४च्या जानेवारी महिन्यातच एका नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्याच्या कमबॅकमुळे चाहते प्रचंड खूश आहेत.

आमिर खानचा आगामी सिनेमा हा २०१८ मध्ये आलेला स्पॅनिश सिनेमा ‘चॅम्पियन्स’चा रिमेक असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन एसआर प्रसन्ना करणार असून जानेवारी महिन्यात शूटिंग सुरू होणार आहे. प्रसन्ना गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत आहे. एका रागीट प्रशिक्षकावर आधारित हा सिनेमा आहे. गतीमंद मंडळींना एकत्र करुन एक टीम बनवणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.

आमिरच्या गाजलेल्या ‘दंगल’ या चित्रपटात त्याने दोन मुलींच्या वडिलांची भूमिका साकारली होती, जे वडील मुलींनी कुस्तीत यश मिळवण्यासाठी त्यांचे क्रीडा प्रशिक्षक होतात. यानंतर आता आमिर पुन्हा एकदा क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण ही भूमिका ‘दंगल’पेक्षा अर्थातच वेगळी असणार आहे.

सध्या या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनचं काम सुरू आहे. त्यानंतर सिनेमाचे निर्माते २९ जानेवारीपासून शूटिंगला सुरुवात करू शकतात. मुंबईत या सिनेमाच्या शूटचं पहिलं शेड्यूल पार पडणार आहे. या सिनेमाचं कास्टिंग खूप महत्त्वाचं असणार आहे. या सिनेमासाठी योग्य कलाकारांची निवड करण्यासाठी अनेकांची ऑडिशन घेण्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -