Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

Stock Market Updates: भारतीय शेअर बाजाराचा नवा उच्चांक

Stock Market Updates: भारतीय शेअर बाजाराचा नवा उच्चांक

मुंबई : भारतीय शेअर बाजार (stock market) गुरुवारी (१४ डिसेंबर) मोठ्या तेजीने उघडला. यूएस फेडरल रिझव्‍‌र्हच्या कामगिरीचा भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम दिसून आला. त्यामुळे बाजार उघडताच सकाळी पहिल्याच सत्रात सेन्सेक्सने (Sensex) ७५० अंकांची वाढ करून ७०,३६५ चा सर्वकालीन उच्चांक गाठला, तर निफ्टीने (Nifty) २१,०००चा टप्पा ओलांडला.


टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो सारखे 'बिग फिश' वेगाने वाटचाल करु लागल्याने आणि निफ्टी आयटीमध्ये २.५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. खास करुन आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील दमदार कामगिरीमुळे बाजाराला ही वाढ अनुभवता आली.


दरम्यान, फेडरल रिझर्व्हने येत्या वर्षात संभाव्य व्याजदर कपातीचे संकेत दिल्यानंतर जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक भावना दिसून आली.

Comments
Add Comment