Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीसंसदेत गोंधळ घालणारे तृणमुलचा एक आणि काँग्रेसचे १४ खासदार निलंबित

संसदेत गोंधळ घालणारे तृणमुलचा एक आणि काँग्रेसचे १४ खासदार निलंबित

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गोंधळ घालणा-या दोन्ही सभागृहातील मिळून १५ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये लोकसभेतील १४ तर राज्यसभेतील एका खासदाराचा समावेश आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गोंधळ घालणा-या या खासदारांना उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. काल झालेल्या घुसखोरीच्या घटनेदरम्यान काँग्रेसच्या पाच खासदारांनी सभापतींच्या आसनाचा मान राखला नसल्याचे कारण दिले आहे. या निलंबित खासदारांमध्ये टी एन प्रथापन, हिबी एडन, डीन कुरियाकोसे, जोथी मणी आणि रम्या हरिदास यांचा समावेश आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असून काल दहाव्या दिवशी दोन तरूणांनी लोकसभेत घुसखोरी केली आणि पिवळ्या रंगाच्या धुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे काल संसदेचे कामकाज काही काळ तहकुब करण्यात आले. तरुणांच्या या कृत्यानंतर संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यावरून आज तृणमुल आणि काँग्रेसच्या खासदारांनी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी सुरक्षेच्या कारणावरून लोकसभेत घोषणा देत गोंधळ घातला.

काँग्रेसच्या खासदारांनी ‘पीएम सदन मे आओ….अमित शाह शरम करो’ अशा प्रकारच्या घोषणा दोन्ही सभागृहात दिल्या गेल्या.

तर राज्यसभेत तृणमुल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी गदारोळा करत घोषणा दिल्या. दरम्यान, निलंबनानंतर ओब्रायन यांनी संसदेच्या आवारात मूक निषेध आंदोलन केले.

या खासदारांचे झाले निलंबन

लोकसभा – माणिकम टागोर, कनिमोळी, पीआर नटराजन, व्ही के श्रीकांतम, बेनी बहन, के सुब्रमण्यम, एसआर प्रतिभा, एस व्यंकटेश, मोहम्मद जावेद, टीएन प्रतापन, हिबी इडेन, ज्योतीमनी, रम्या हरिदास, डीन क्युरिकोस.

राज्यसभा – राज्यसभेतील तृणमूल काँग्रेस खासदार दारेक ओब्रायन.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -